शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
2
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
3
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
4
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
5
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
6
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
7
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
8
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
9
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
10
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
11
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
12
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
13
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
14
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
15
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
16
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
17
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
18
IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी...
19
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
20
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

TET paper leak case: ॲकॅडमीचालक, शिक्षकांचेच रॅकेट; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता

By उद्धव गोडसे | Updated: November 25, 2025 11:53 IST

कोट्यवधींची उलाढाल

उद्धव गोडसेकोल्हापूर : टीईटी परीक्षेचा पेपर आधीच फोडून तो परीक्षार्थींपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणारे रॅकेट काही ॲकॅडमीचालक आणि शिक्षकांनीच चालवल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर पोलिसांनी रविवारी (दि. २३) अटक केलेल्या आरोपींमध्ये चार शिक्षक आणि तीन ॲकॅडमीच्या चालकांचा समावेश आहे. या गुन्ह्यात शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे याचे धागेदोरे कुठपर्यंत जाणार याची चर्चा राज्यातील शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.सातारा जिल्ह्यातील बेलवाडी (ता. कराड) येथे निवृत्त जवान संदीप भगवान गायकवाड याने १५ वर्षांपूर्वी गावातच जय हनुमान करिअर ॲकॅडमी सुरू केली. या ॲकॅडमीत सैन्य भरती, पोलिस भरती, वन विभागातील कर्मचारी, अधिकारी भरती यांसह इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. निवृत्त जवान संदीप आणि त्याचा लहान भाऊ महेश गायकवाड हे दोघे ॲकॅडमी चालवतात. हेच टीईटी आणि सेट परीक्षेचे पेपर फोडून पुढे एजंटमार्फत परीक्षार्थींपर्यंत पोहोचवत होते. गडहिंग्लज तालुक्यातील राहुल अनिल पाटील (रा. शिंदेवाडी) आणि कागल तालुक्यातील दयानंद भैरू साळवी (रा. तमनाकवाडा) यांच्याही ॲकॅडमी आहेत. साळवी याची पत्नी गावात सरपंच होती. हे दोघे गायकवाड बंधूंकडून मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका पुढे एजंटकडे पाठवून पैसे उकळत होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे.शिक्षक गुरुनाथ दत्तात्रय चौगले (रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी) हा सोळांकुर येथील कनिष्ट महाविद्यालयात नोकरी करतो. किरण साताप्पा बरकाळे (रा. ढेंगेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याची पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून निवड झाली आहे. अभिजित विष्णू पाटील (रा. बोरवडे, ता. कागल), रोहित पांडुरंग सावंत (रा. कासारपुतळे, ता. राधानगरी) दोघेही दूध साखर विद्यानिकेतन बिद्री, ता. कागल) येथे नोकरी करतात. पेपरफुटीतील त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने अटकेची कारवाई झाली. आता ते काम करीत असलेल्या शैक्षणिक संस्थांकडूनही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.पेपर बाहेर आलाच?अटकेतील गायकवाड टोळीकडून शनिवारी रात्री कोणालाही टीईटीचा पेपर मिळाला नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी रात्री काही परीक्षार्थींना पेपर मिळाला होता, अशी शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे. ती टोळी वेगळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांना आणखी खोलात जाऊन चौकशी करावी लागणार आहे.

बेईमानीचे काम इमानदारीनेशिक्षक आणि ॲकॅडमी चालक टीईटीमध्ये पास करण्याची हमी देत होते. पास झाल्यानंतरच ते पैसे घेत होते. दगाफटका होऊ नये, यासाठी परीक्षार्थींची मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली जात होती. टीईटी आणि सेट परीक्षेसह अन्य स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांनी असे बेईमानीचे काम इमानदारीने केल्याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TET paper leak: Academy owners, teachers in racket; officials suspected.

Web Summary : TET paper leak involved academy owners and teachers. Police arrested several, suspecting higher officials' involvement. Racket promised guaranteed passing for money, holding documents as collateral. Further investigation is ongoing.