It has been revealed that a minor girl was lured away and raped | अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले, बलात्कार झाल्याचे उघड

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले, बलात्कार झाल्याचे उघड

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले, बलात्कार झाल्याचे उघडएकास अटक, दोघावर गुन्हा दाखल

कोडोली : आरळे ता. पन्हाळा येथे मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवुन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.  या प्रकरणी अक्षय चंद्रकांत नांगरे, रा.आनंदनगर, कोडोली (ता. पन्हाळा) यास पोलिसांनी अटक केल्याची माहिती कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि सुरज बनसोडे यांनी सागितले.

अल्पवयीन मुलगी आरळे (ता. पन्हाळा) येथे आपल्या मामाच्या घरी राहण्यास आली होती. अक्षयने मूलीस फूस लावून दि. २९ सप्टेंबर रोजी घराच्या मागील दरवाजातून पळवून नेले, अशा आशयाची फिर्याद सागर बुधाजी महापूरे (रा आरळे, ता. पन्हाळा) यांनी पोलिसात दिली होती. फिर्यादीनुसार मुलीस पळवून नेण्यास मदत केली म्हणून साहिल नांगरे व अमर साळवी (दोघेही रहाणार कोडोली, ता. पन्हाळा ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीस लग्नाचे आमिष दाखवून इस्लामपूर ( जि. सांगली ) येथे अक्षयने बलात्कार केला. तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून सध्या तिला आईवडीलाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. अक्षय नांगरे यास पन्हाळा न्यायालयात उभे केले असता त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सुरज बनसोडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: It has been revealed that a minor girl was lured away and raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.