शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
7
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
8
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
9
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
11
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
12
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
13
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
14
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
15
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
16
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
17
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
18
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
19
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
20
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीनाही वेळेत दाखले देणे बंधनकारक

By admin | Updated: July 16, 2015 00:41 IST

ग्रामस्थांचे हेलपाटे थांबणार : सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू; १३ दाखल्यांचा समावेश

कोल्हापूर : ग्रामपंचायतीमधून दिले जाणारे १३ प्रकारचे दाखले लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत देणे बंधनकारक केले आहे. महसूलपाठोपाठ बुधवारी ग्रामविकास विभागानेही गावपाळीवर थेट जनतेशी संबंधित असणारे विविध दाखले या कायद्यांतर्गत द्यावेत, असे आदेश शासनाचे प्रधान सचिव वि. गिरिराज यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ असा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना अनेक वर्षांपासून येतोे. यातून सुटका व्हावी, हेलपाटे थांबावेत, निर्धारित वेळेत कामे व्हावीत म्हणून राज्यात सेवा कमी कायद्याची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू झाली. परंतु, शासनाच्या विभागनिहाय कोणत्या सेवा द्यावयाच्या हे निश्चित नसल्याने पहिल्याच दिवशी अंमलबजावणीचा फज्जा उडाला.दरम्यान, आठवड्यानंतर का असेना, ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत पातळीवरील १३ प्रकारचे दाखले या कायद्यांतर्गत देणे सक्तीचे केले आहे. यासाठी नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची निवड करून द्यावयाच्या सेवा व अधिकाऱ्यांचे नाव ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात फलकावर लावावे, अशी सूचना दिली आहे. या कायद्यामुळे दप्तरदिरंगाईला चाप बसणार आहे. निर्धारित वेळेत दाखला न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्याला दंड होणार आहे. (प्रतिनिधी)लोकसेवेचे नाव (दाखले)नियम कालमर्यादा १) जन्मनोंद५ दिवस २) मृत्युनोंद५ दिवस ३) विवाहनोंद५ दिवस ४) रहिवाशी ५ दिवस ५) दारिद्र्यरेषेखालील ५ दिवस ६) हयातीचा ५ दिवस ७) ग्रामपंचायत येणेबाकी५ दिवस ८) शौचालय ५ दिवस ९) नमुना आठचा उतारा५ दिवस १०) निराधार असल्याचा२० दिवस ११) विधवा असल्याचा२० दिवस १२) परित्यक्ता असल्याचा २० दिवस १३) विभक्त २० दिवसस्वतंत्र नोंदवही ठेवावीग्रामपंचायत कार्यालयात सेवाहमी कायद्यांतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाकरिता स्वतंत्र नोंद ठेवावी, अशी सूचना दिली आहे. हयातीचा, दारिद्र्यरेषेखालील, निराधार असल्याचा दाखला मोफत दिला जाणार आहे. उर्वरित दाखल्यांसाठी अर्जासोबतच २० रुपये मोजावे लागणार आहेत.जर असा दाखला वेळेत दिला गेला नाही, तर संबंधित व्यक्ती पदनिर्देशित अधिकाऱ्याविरोधात पुढील ३० दिवसांत प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे दाद मागू शकते. प्रथम अपील अधिकारी या विलंबासंदर्भात चौकशी करतील आणि दंडात्मक कारवाई करतील.जर प्रथम अपील अधिकारी सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडून न्याय मिळत नाही, असे वाटत असल्यास संबंधित व्यक्ती ४५ दिवसांच्या आत द्वितीय अपील अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडे दाद मागू शकते. जर प्रथम अपील अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय दिला आहे, असे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यावरही दंडात्मक कारवाई होऊ शकते. पदनिर्देशीय अधिकारी ग्रामसेवक असतील.