शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात शिवपुतळ्याच्या जागेचा प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

जयसिंगपूर : येत्या महिन्याभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आरक्षित असलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतर करून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम ...

जयसिंगपूर : येत्या महिन्याभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आरक्षित असलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतर करून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू करू. जागेचा प्रश्न मिटला नाही तर पैसे भरून जागा उपलब्ध करू, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. जयसिंगपूर नगरपरिषद व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला. प्रारंभी नगराध्यक्षा डॉ. नीता माने व उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिवप्रेमींची महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अक्षय तृतीयेला याच जागेवर महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन होईल, असा विश्वास व्यक्त केला.

उपनगराध्यक्ष यड्रावकर म्हणाले, येत्या दोन महिन्यांत आरक्षित जागेच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून प्रश्न निकालात काढू. नगरसेवक सर्जेराव पवार म्हणाले, १३ मे पर्यंत जागेचा प्रश्न निकाली न निघाल्यास माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा.

याप्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील, पोलीस उपधीक्षक रामेश्वर वैंजणे, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, सावकर मादनाईक, आदित्य घाटगे, बजरंग खामकर, शंकर नाळे, अभिजित भांदिगिरे, डॉ. सविता पाटील, स्वाती भापकर, अर्चना भोजणे यांच्यासह नगरसेवक, शिवप्रेमी उपस्थित होते.

फोटो - १९०२२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.