IPL 2020: आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात! कोल्हापुरात मुंबई अन् चेन्नईच्या चाहत्यांमध्ये पोस्टर वॉर

By प्रविण मरगळे | Published: September 20, 2020 09:13 PM2020-09-20T21:13:34+5:302020-09-20T21:15:17+5:30

मागील महिन्यातही कोल्हापुरात धोनीच्या चाहत्याला मुंबई इंडियन्स चाहत्यांनी ऊसाच्या फडात नेऊन चोपल्याची घटना घडली होती.

IPL 2020: Poster war among Mumbai Indians and Chennai Superking fans in Kolhapur | IPL 2020: आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात! कोल्हापुरात मुंबई अन् चेन्नईच्या चाहत्यांमध्ये पोस्टर वॉर

IPL 2020: आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात! कोल्हापुरात मुंबई अन् चेन्नईच्या चाहत्यांमध्ये पोस्टर वॉर

googlenewsNext

कोल्हापूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएल सोहळा देशाबाहेर होत असला तरी त्याचा उत्साह देशात शिगेला पोहचला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयपीएलच्या टीमचे चाहते आपापल्या टीमसाठी चिअर्स करत असतात. क्रिकेटप्रेमींचा हा जोश इतका असतो की, खेळाबाहेरही चाहते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनतात. कोल्हापूरात मागील महिन्यात अशाच एका समर्थकाला ऊसाच्या फडात नेऊन चोपल्याची घटना घडली होती.

त्यानंतर आता पुन्हा कोल्हापूरात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग यांच्या समर्थकांतील पोस्टर वॉर समोर आलं आहे. राधानगरीच्या मार्केट चौकात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी बॅनर्स झळकावल्यानंतर चेन्नई सुपरकिंगच्या चाहत्यांनीही त्याला उत्तर दिलं. मुंबई इंडियन्स समर्थकांच्या बॅनरशेजारीच चेन्नई सुपर किंगच्या चाहत्याने बॅनर झळकावून त्यावर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना उत्तर दिलं.

या बॅनरमधून मुंबई इंडियन्सचे चाहते म्हणतात जल मत, बराबरी कर, मुंबई इंडियन्स फक्त नावातच दहशत तर धोनी साहेब  म्हणून उल्लेख करत चेन्नई सुपरकिंगचे समर्थक बॅनरमधून उत्तर देतात. तर या बॅनरमधून किंग ऑफ आयपीएल, आण्णा म्हणत्यात, सलाम ठोकत्यात असंही मुंबईच्या चाहत्यांनी म्हटलं आहे तर चेन्नईच्या चाहत्यांनी आण्णा गेले बंबात...कट्टर समर्थक म्हणून त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

काय घडलं होतं कोल्हापूरात?

कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये १५ ऑगस्टला एम एस धोनीच्या चाहत्यांनी डिजिटल फलक लावू केले त्याचे आभार मानले होते. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने अभिनंदनाचा पोस्टर्स लावले होते. त्यावरुन कुरुंदवाडीत एम एस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये कॉल्ड वॉर सुरु झाला. त्याचा परिणाम धोनीच्या चाहत्याला विरोधी गटाने ऊसाच्या फडात नेऊन चोपल्याचा प्रकार घडला होता.

वीरेंद्र सहवागनेही कोल्हापूरच्या फॅन्सच्या फटकारलं होतं.

खेळाडू एकमेकांशी प्रेम करतात किंवा जास्त बोलत नाहीत, कामाशी काम ठेवतात. पण काही फॅन्स हद्द पार करतात. एकमेकांशी लढू नका, टीम इंडियाला एकच टीम म्हणून आठवण करा अशा शब्दात वीरेंद्र सहवागनं चाहत्यांना फटकारलं होतं.  

 

Web Title: IPL 2020: Poster war among Mumbai Indians and Chennai Superking fans in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.