शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

सुहासिनीदेवी घाटगे यांना धमकी देणाऱ्याचा कसून शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:12 IST

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, अन्यथा काहीतरी बरेवाईट घडेल, अशी धमकी ...

ठळक मुद्देसुहासिनीदेवी घाटगे यांना धमकी देणाऱ्याचा कसून शोधशाहूपुरी पोलीस, सायबर ब्रँच पथकांची नियुक्ती : अभिनव देशमुख यांची माहिती

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, अन्यथा काहीतरी बरेवाईट घडेल, अशी धमकी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर देणाऱ्या अज्ञाताचा शाहूपुरी पोलीस व सायबर क्राइम अशी दोन पथके कसून शोध घेत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले, सुहासिनीदेवी घाटगे यांच्या दोन मोबाईल नंबरवर धमकीचे फोन शुक्रवारी (दि. ४) आणि शनिवारी (दि. ५) आले होते. या घटनेने वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. धमकीचा मानसिक ताण आल्याने सुहासिनीदेवी घाटगे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

समरजित घाटगे यांनी सोमवारी (दि. ७) शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सुहासिनीदेवी यांचा कीपॅडचा साधा मोबाईल आहे. हे दोन्ही मोबाईल पोलिसांनी तपासले. धमकी ज्या फोनवरून आली, तो नंबर त्यांच्या मोबाईलमधून डिलीट झाला आहे. त्यांनी संबंधित कंपनीकडे इनकमिंग नंबरची माहिती मागितली आहे. या तपासासाठी सायबरतज्ज्ञांची मदत घेतली आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

बंदूकधारी शरीररक्षकाची नियुक्ती

समरजित घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार दोन बंदूकधारी पोलीस शरीररक्षक त्यांना २४ तास सोबत दिले आहेत. त्यांच्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर यांनाही मागणीनुसार दोन शरीररक्षक दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.


सुहासिनीदेवी घाटगे यांना आलेल्या धमकीची सखोल चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल असून अज्ञाताच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.
संजय मोरे,
 निरीक्षक व तपास अधिकारी
 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर