कंत्राटी कामगारांचा ठेका घेणाऱ्या कंपनीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 19:20 IST2021-06-23T19:18:56+5:302021-06-23T19:20:17+5:30

Collcator Kolhapur : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.

Investigate the contracting company | कंत्राटी कामगारांचा ठेका घेणाऱ्या कंपनीची चौकशी करा

 स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देकंत्राटी कामगारांचा ठेका घेणाऱ्या कंपनीची चौकशी करा राष्ट्रीय बहुजन महासंघाची मागणी

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांना कंत्राटी कामगार कायदा लागू असूनही या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने कंत्राटी कामगारांना कामावरुन काढून टाकरण्याबरोबरच त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन व कामगार भाविष्य निर्वाह निधीही कंत्राटी कायद्याप्रमाणे दिले जात नाही.

याबाबत ठेकेदार आणि ठेका घेणाऱ्या कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, कंत्राटी कामगाराची आर्थिक लूट थांबवून त्यांच्या कष्टाचे वेतन आणि भविष्यनिर्वाह निधी हा कंत्राटी कायद्याप्रमाणे द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर राष्ट्रीय बहुजन महासंघाचे सचिव संदीप कांबळे, संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे आणि तुकाराम काबळे, सदस्य सतीश कासे, शितलकुमार गवंडी,स्वाती किल्लेदार, अलका देवळकर, प्रकाश पाटील, आमीर सलगर, रुपाली पोवार, अर्जुन कासे, समृध्दी वानखेडे आदींच्या सह्या आहेत.
 

Web Title: Investigate the contracting company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.