एशियन चॅम्पियनशीप : कोल्हापूरच्या सोनम मस्करला नेमबाजीत सुवर्ण

By सचिन भोसले | Updated: October 28, 2023 19:19 IST2023-10-28T19:18:34+5:302023-10-28T19:19:19+5:30

गौतमी बानोट, जास्मिक कौरची साथीने सांघिक कामगिरी

International shooter Sonam Maskar of Kolhapur won gold medal in Asian Championship shooting event | एशियन चॅम्पियनशीप : कोल्हापूरच्या सोनम मस्करला नेमबाजीत सुवर्ण

एशियन चॅम्पियनशीप : कोल्हापूरच्या सोनम मस्करला नेमबाजीत सुवर्ण

कोल्हापूर : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्कर हिने दक्षिण कोरिया येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक मिळवले. तिने ही कामगिरी गौतमी बानोट आणि जास्मिन कौर यांच्या साथीने केली.

या तिघींनी या स्पर्धेत १८९१.६ गुण मिळवत सुवर्ण पदक मिळवले. सोनमने वैयक्तीक गटात पात्रता फेरीत अतिशय चांगली कामगिरी करीत ६३२.६ गुण मिळवत आपले अंतिम फेरीतील स्थान पक्के केले हेते. मात्र, ०.२ गुणांनी तिचे कास्यंपदक हुकले आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सोनमचे हे सलग तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग तिसरे पदक आहे. यापूर्वी विश्वचषक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने पदक मिळवले आहे.

सध्या गोव्यात सुरु असलेल्या नॅशनल गेम्स करीताही तिची निवड झाली आहे. ती दहा मीटर एअर रायफल वैयक्तीक व दहा मीटर रायफल मिश्र प्रकारात भाग घेणार आहे. ती मुळची पुष्पनगर, गारगोटीची रहिवासी आहे. तिला गेल्या तीन वर्षांपासून वेध रायफलच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक राधिका हवालदार-बराले आणि रोहीत हवालदार हे मार्गदर्शन करीत आहे.

Web Title: International shooter Sonam Maskar of Kolhapur won gold medal in Asian Championship shooting event