शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

सभासदांच्या मुलांना नोकरीची संधी देणारी संस्था

By admin | Updated: January 23, 2015 23:35 IST

जि. प. कर्मचारी सोसायटी : उद्या नूतन इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर : संस्थेत नोकरभरती करताना सभासदांच्या घरी भरतीची जाहिरात पाठवून, त्यातून गुणवत्तेनुसार भरती प्रक्रिया राबविणारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. त्याचबरोबर काटकसरीचा कारभार करीत अडीच कोटींचा निव्वळ नफा कमवीत सहकारातील ‘आदर्श संस्था’ म्हणून ती पुढे येत आहे. सन १९६६ मध्ये स्थापन झालेली ही संस्था कर्मचाऱ्यांचा आधारवड ठरली होती; पण सहा-सात वर्षांपूर्वी ती राजकीय उधळपट्टीने आर्थिक अरिष्टात सापडली होती. विद्यमान अध्यक्ष एम. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली सहा वर्षे संचालकांनी संस्थेला आर्थिक अरिष्टातून तर बाहेर काढलेच; पण त्याबरोबर सभासदांना आधार देत संस्था कशी बळकट करता येते, याचे उत्तम उदाहरण सहकारासमोर ठेवले आहे. संस्थेच्या ठेवींत तब्बल २४ कोटी ६३ लाखांची वाढ झाली. सभासद कर्जे वाढलीच; पण त्याबरोबर कर्जांचे दरही दोन टक्क्यांनी कमी करण्याची किमयाही संचालकांनी केली. जिल्हा बॅँकेकडून सुमारे बारा कोटी १२.५ टक्के व्याजदराने सोसायटीने घेतले व सभासदांना मात्र १२ टक्क्याने वाटप केले, असे असतानाही सोसायटीचा नफा २ कोटी ४० लाख रुपये आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकांनी नोकरभरती करताना सभासदांच्या घरी जाहिरात पाठवून पात्र उमेदवारांचे अर्ज मागवून त्यांची परीक्षा घेऊनच निवड केली. या संस्थेने इमारत उभी केली आहे. तिचे उद्घाटन रविवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते, खासदार धनंजय महाडिक, खा. राजू शेट्टी, विमल पाटील, आदींच्या उपस्थितीत होत आहे. सहा वर्षांपूर्वी संस्थेच्या तीन हजार सभासदांनी ज्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी सोपविली, तो विश्वास जोपासत संस्थेला अव्वल स्थानी नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सुकाणू समितीचे मार्गदर्शन लाभलेच; पण त्याबरोबर सभासदांनी केलेले सहकार्य विसरता येणार नाही.  --- एम. आर. पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी