ऑक्सीजन निर्मितीच्या ठिकाणी विद्यूत जनरेटर बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 19:09 IST2021-04-26T19:08:16+5:302021-04-26T19:09:55+5:30
CoronaVirus Kolhapur : राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सीपीआर, आयजीएम. या ठिकाणी ऑक्सीजन निर्मीती तसेच उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज येथे रिफीलिंग प्रकल्प बसविण्यात येत आहे. या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत, येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता तपासून आवश्यकतेप्रमाणे ते बदलावेत, अशा सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केल्या.

ऑक्सीजन निर्मितीच्या ठिकाणी विद्यूत जनरेटर बसवा
कोल्हापूर : राधानगरी, मुरगूड, मलकापूर, कोडोली, सीपीआर, आयजीएम. या ठिकाणी ऑक्सीजन निर्मीती तसेच उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज येथे रिफीलिंग प्रकल्प बसविण्यात येत आहे. या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत, येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता तपासून आवश्यकतेप्रमाणे ते बदलावेत, अशा सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी सर्वांनी नियंत्रण कक्षासाठी सेवा द्यावी, त्याबाबत तीन सत्रात नियोजन करावे असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ येथील कोविड रूग्णालयात टास्क फोर्सने सेवा द्यावी, गृह विलगीकरणातील रूग्णांना रूग्णालयांनी सेवा पुरवावी. तसेच ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करावे अशी सुचना केली.
यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कोविड रूग्णालयात गरजूंना बेड उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय भरारी पथकामार्फत रूग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ज्याला बेडची गरज नाही, अशा रूग्णांची हॉटेलमध्ये व्यवस्था करून त्यांच्यावर रूग्णालयामार्फत उपचार करण्यात येतील असे सांगितले.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, उपाध्यक्ष डॉ. गीता पिल्लई, सचिव डॉ. किरण दोशी, सल्लागार डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. नीता नरके, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमर आडके, डॉ. शीतल देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. मुकुंद मोकाशी उपस्थित होते.
---
फोटो नं २६०४२०२१-कोल-पालकमंत्री बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना ऑक्सीजन निर्मिती व कोरोना रुग्णांना सेवासुविधा याबाबत सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
--