शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 2:40 PM

सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली.

ठळक मुद्दे स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा  : राजेंद्र पाटील-यड्रावकर सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट

कोल्हापूर : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली.सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी बैठक घेतली.

ते म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, धोका टळला सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर लवकरात लवकर फायर ऑडीट करुन घ्यावे. आरोग्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा द्यावी. जिल्ह्यातील बाधितांची संख्या, मुक्त झालेल्यांची संख्या, मृत्यूदर, उपचार घेत असणारे रुग्ण, रेमडेसिवीरची उपलब्धता, इतर अनुषंगिक औषधांची उपलब्धता, आरोग्य साधनांची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती यड्रावकर यांनी घेतली.यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे, डॉ. बी. वाय. माळी उपस्थित होते.

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयministerमंत्रीkolhapurकोल्हापूर