गडहिंग्लजला ऑक्सिजन प्लँटसाठी जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:15 IST2021-05-07T15:13:15+5:302021-05-07T15:15:14+5:30
CoronaVirus Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात आणखी एक ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे. प्लँटसाठी जागेची पाहणी करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या प्लँटची व नव्या प्लँटसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रूग्णालयाला भेट देवून केली.

गडहिंग्लज येथे नवीन ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपजिल्हा रुग्णालयातील जागेची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर तहसीलदार दिनेश पारगे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत खोत उपस्थित होते.
गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात आणखी एक ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे. प्लँटसाठी जागेची पाहणी करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या प्लँटची व नव्या प्लँटसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रूग्णालयाला भेट देवून केली.
नवीन प्लँटच्या उभारणीसाठी येत्या आठ दिवसात त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत बांधकाम, वीज वितरणसह संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत. रूग्णालय व ऑक्सिजन प्लँटसाठी वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्यासाठी आराखडा मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या.
सध्या सुरू असलेल्या प्लँटमध्ये सिलींडर रिफीलिंगचे मशीन नाही. त्यामुळे सिलींडर रिफीलिंग करता येत नाही. त्यासाठी नव्या प्लँटमध्ये रिफीलिंग करण्याचे बुस्टर मशीन देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. त्यामुळे खाजगी दवाखान्यांतही सिलिंडर भरून देता येईल.
ऑक्सिजन प्लॅटमधून होणार पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी प्लँटच्या नियंत्रणासाठी एका नोडल अधिकाºयाची निवड करावी. नवीन प्लँटमधून १२० जंबो सिलींडर इतकी आॅक्सिजन निर्मितीची क्षमता असून त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार होणार नाही.