किणी येथे मंजूर झालेल्या रुग्णालयाच्या जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:21+5:302021-06-09T04:30:21+5:30

किणी: येथे राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या ३० खाटांचे रुग्णालयाच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे ...

Inspection of approved hospital premises at Kini | किणी येथे मंजूर झालेल्या रुग्णालयाच्या जागेची पाहणी

किणी येथे मंजूर झालेल्या रुग्णालयाच्या जागेची पाहणी

किणी: येथे राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या ३० खाटांचे रुग्णालयाच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राजूबाबा आवळे यांनी भेटी दरम्यान सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील उपस्थित होते.

पुणे-बंगलोर महामार्गावरील अपघातातील जखमींवर तातडीने उपचारासाठी व पचंक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी मोठ्या शासकीय रुग्णालयाची अनेक वर्षे मागणी होत होती. यासाठी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी ग्रामपंचायतीच्यावतीने पाठपुरावा केला होता. मंत्री राजेंद्र पाटील व आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रयत्नाने रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. या बांधकामासाठी १४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागेची पाहाणी केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता बी.एल.हजारे,उपअभियंता यू.एस.करांडे, वारणा दूध संघाचे संचालक ॲड.एन.आर.पाटील ,उपसरपंच अशोक माळी,बाळगोंडा पाटील, सुहास माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

०७ किणी

किणी येथे मंजूर झालेल्या रुग्णालयाच्या जागेची पाहणी करताना मंत्री राजेंद्र पाटील, यड्रावकर आमदार राजूबाबा आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, बाळगोंडा पाटील, ॲड. ए. आर पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Inspection of approved hospital premises at Kini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.