शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तो पाहुणा म्हणून यायचा, दागिने चोरून निघून जायचा; सराईत चोरटा बाळासो पाटील अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:00 IST

दागिने पुरून ठेवले, तीन गुन्ह्यांचा उलगडा

कोल्हापूर : लग्न, जावळ, बारसे अशा समारंभांमध्ये पाहुणा बनून येऊन दागिन्यांवर डल्ला मारणारा सराईत चोरटा बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील (वय २८, रा. आदमापूर, ता. भुदरगड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीत तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, चोरीतील ३ लाख ७८ हजारांचे ४२ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले.नवीन कपडे, डोक्यावर फेटा आणि हसऱ्या चेहऱ्याने तो समारंभात सर्वत्र वावरायचा. जणू काही या समारंभाचे आपणच आयोजक आहे, असा त्याचा थाट असायचा. मुहूर्तापूर्वी तो पाहुणे आणि निमंत्रितांनी आणलेल्या चीजवस्तू हेरून ठेवायचा. मंगल अक्षता सुरू होताच वधू-वराच्या खोलीत जाऊन दागिन्यांवर डल्ला मारायचा. पाहुणा बनून येऊन समारंभात चोरी करणाऱ्या चोरट्याने गेल्या महिनाभरात धुमाकूळ घातला होता.चोरी झालेल्या समारंभांमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर संशयित चोरटा आदमापूर येथील बाळासो ऊर्फ अजित पाटील असल्याची माहिती अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी आणि अमित सर्जे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि शेष मोरे यांच्या पथकाने आदमापुरातून चोरट्याला अटक केली.त्याच्या चौकशीत लक्ष्मीपुरी, कळंबा येथील जय पॅलेस आणि हणबरवाडी येथील सृष्टी फार्महाऊसमध्ये झालेल्या तीन चोऱ्यांचा उलगडा झाला. त्याने आणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. पुढील तपासासाठी त्याचा ताबा लक्ष्मीपुरी पोलिसांकडे देण्यात आला.कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत २१ गुन्हेबाळासो पाटील हा सराईत चोरटा असून, तो दहावी नापास आहे. आदमापुरातील बाळूमामा मंदिरात बकऱ्यांचा सेवेकरी म्हणून तो काम करतो. सेवेच्या निमित्ताने बाहेर फिरताना तो चोऱ्या करत होता. त्याच्यावर कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत घरफोडी, जबरी चोरीचे २१ गुन्हे दाखल आहेत.

इन्स्टावर ३० हजार फॉलोअर्ससराईत चोरटा पाटील हा इन्स्टा अकाऊंटवरून बाळूमामा मंदिरातील फोटो टाकतो. त्याचे ३० हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी अटक करून त्याचे खरे रूप लोकांसमोर आणले.

दागिने पुरून ठेवलेबाळासोा पाटील याने चोरीतील सर्व दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून तो डबा गावात जनावरांच्या शेडजवळ पुरला होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने डबा पुरलेली जागा दाखवली. पोलिसांनी जमीन खोदून दागिन्यांचा डबा बाहेर काढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस