सातजणांवर गुन्हा : कोल्हापूर बोंद्रेनगरात मारहाणीत तरुण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:42 IST2020-04-14T10:40:36+5:302020-04-14T10:42:18+5:30

या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रविवारी संबंधित सातजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 

Injured in Kolhapur Bondrain | सातजणांवर गुन्हा : कोल्हापूर बोंद्रेनगरात मारहाणीत तरुण गंभीर जखमी

सातजणांवर गुन्हा : कोल्हापूर बोंद्रेनगरात मारहाणीत तरुण गंभीर जखमी

ठळक मुद्दे काठी, धारदार शस्त्राने केला हल्ला

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवर बोंद्रेनगरात पूर्ववैमनस्यातून एका जमावाने धारदार शस्त्र व काठीने बेदम मारहाण केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला. तानाजी धोंडिराम झोरे (वय ३३, रा. जांभळे कॉलनी, बोंद्रेनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तानाजी झोरे हे गेले वीस दिवस बाहेरगावी गेले होते. शनिवारी पहाटे कोल्हापुरात आले. दिवसभर घरी थांबून रात्री आठ वाजता औषध आणण्यासाठी कॉलनीतीलच एका औषध दुकानात गेले होते. त्यावेळी संजय कात्रट, प्रकाश बोडके, कृष्णात बोडेकर (सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत), संजय शेळके (रा. गडकरी कॉलनी, बोंद्रेनगर), सागर गंगाराम बोडेकर (रा. बोंद्रेनगर), अंदू जानकर (रा. गगनगिरी पार्क), सुरेश बापू बोडेकर (रा. जांभळे कॉलनी) यांनी झोरे याला एकटे गाठून काठ्यांनी व धारदार शस्त्रांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रविवारी संबंधित सातजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 
 

 

Web Title: Injured in Kolhapur Bondrain