स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:45 IST2025-04-30T12:45:12+5:302025-04-30T12:45:26+5:30

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे निवेदन

Independent newspaper vendor welfare board coming soon Labour Minister Akash Fundkar assures | स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आश्वासन 

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आश्वासन 

कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची रचना व आर्थिक तरतुदीबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यरत करू, असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक, ठाणे येथील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने मंत्री फुंडकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी ते बोलत होते.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मागील सरकारच्या काळात मंत्रिमंडळ बैठकीत स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. कल्याणकारी मंडळाद्वारे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी पेन्शन, व्यवसायासाठी मदत, साधनसामग्रीची पुरवठा, आरोग्य सुविधा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांच्या उच्चशिक्षणासाठी योजना लागू कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे उपस्थित होते.

Web Title: Independent newspaper vendor welfare board coming soon Labour Minister Akash Fundkar assures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.