कोल्हापुरात आणखी १८ केंद्रामध्ये टपाल स्विकारण्यासाठी वाढीव वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:30 IST2018-11-16T15:29:15+5:302018-11-16T15:30:51+5:30
टपाल स्विकारण्याच्या वेळेत १ तास ३0 मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापुरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा आता आणखी १८ कार्यालयामध्ये शुक्रवारपासुन सुरु झाली. तसेच उशिरा स्विकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व रेल्वे डाक सेवेकडे पाठवणे अधिक वेगाने व्हावे म्हणून विशेष रिक्षाही सुरु करण्यात आली आहे.

जलदगतीने टपाल संकलनासाठी घेण्यात आलेल्या रिक्षाचे अनावरण करताना पोस्टमास्तर जनरल गोव्याचे डॉ. एन.विनोदकुमार, प्रवर अधिक्षक सांगलीचे ए.कोरगावकर, कोल्हापूरचे आय.डी.पाटील, गोव्याच्या अर्चना गोपीनाथ, रत्नागिरीचे ए.बी.कोड्डा, सिंधूदुर्गचे संजय देसाई, वस्तू भांडार अधिक्षक अशोक खोराटे उपस्थित होते.
कोल्हापूर: टपाल स्विकारण्याच्या वेळेत १ तास ३0 मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापुरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा आता आणखी १८ कार्यालयामध्ये शुक्रवारपासुन सुरु झाली. तसेच उशिरा स्विकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व रेल्वे डाक सेवेकडे पाठवणे अधिक वेगाने व्हावे म्हणून विशेष रिक्षाही सुरु करण्यात आली आहे.
कोल्हापूरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते व प्रवर अधिक्षक आय.डी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी या सेवेचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले.
झपाट्याने विकसीत होणाऱ्या कोल्हापूर शहरातील नागरीक तसेच व्यावसायिकांच्या पत्रव्यवहार व दळणवळणातील वाढत्या गरजा, ग्राहकांच्या सोयीसाठी टपाल स्विकारण्याच्या वेळेत वाढ करण्याचा उपक्रम कोल्हापूर डाक विभागाने राबवला. त्यासाठी जिल्ह्यातील १४ प्रमुख पोस्ट कार्यालये निवडण्यात आली.
येथे रोजच्या वेळेपेक्षा १ तास ३0 मिनिटांनी टपाल स्विकारण्यास सुरुवात झाली. २0 आॅगस्ट ते १४ नोव्हेबर या कालावधीत या १४ कार्यालयातून ९ हजार ५३८ रजिस्टर टपाल, ८ हजार ४३२ स्पीड पोस्ट, ६२१ पार्सल याचे संकलन वाढीव वेळेत करण्यात आले.