शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

जिल्ह्यात ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा वाढीव पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 11:23 AM

CornaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज शुक्रवारपासून १५ टन ऑक्‍सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा चार पट वाढीव पुरवठा सुरू झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असून, पुढील आठवड्यापर्यंत सगळं सुरळीत होईल, असंही ते म्हणाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा वाढीव पुरवठा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती, पाठपुराव्याचे फलित

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी आज शुक्रवारपासून १५ टन ऑक्‍सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा चार पट वाढीव पुरवठा सुरू झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असून, पुढील आठवड्यापर्यंत सगळं सुरळीत होईल, असंही ते म्हणाले.डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी मी स्वत: व पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबईत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आज जवळपास तिप्पट -चौपट इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत.

यापूर्वी जिल्ह्याला रोज ३० टन ऑक्सिजन पुरवठा होत होता तो आता १५ टनाने वाढून ४५ टन इतका होणार आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाला असून, आजच अडीच हजारावर इंजेक्शन मिळाले आहेत. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध आहेत. कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून, आठवड्याभरात हे सर्व आटोक्यात येईल.

जिल्ह्यात मृत्यूदर जास्त असला तरी आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर आता वाढलेलाच आहे.मुंबईत कोरोना परिस्थितीत सुधारणा करत ऑक्सिजनचे मॅनेजमेंट केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारचा गौरव केला आहे. दुसऱ्या लाटेशी यशस्वी संघर्ष केल्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. परवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे कौतुक केले आहे. हे सर्व एका बाजूला होत असताना, भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार अमल महाडिक दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर