मूल्यांकन समितीचे अधिकार वाढवा

By Admin | Updated: June 15, 2015 00:41 IST2015-06-15T00:41:17+5:302015-06-15T00:41:46+5:30

चंद्रकांतदादा, ‘एन.डी.’ यांची टोलबाबत चर्चा

Increase the rights of the evaluation committee | मूल्यांकन समितीचे अधिकार वाढवा

मूल्यांकन समितीचे अधिकार वाढवा

कोल्हापूर : रस्ते विकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या नेमलेल्या मूल्यांकन समितीचे अधिकार वाढवा. करारात नमूद केलेल्या दर्जानुसार न झालेली कामे न स्वीकारण्याचा अधिकार समितीला द्या, अशी मागणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.
रविवारी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत बैठक झाली. संपूर्ण टोलमाफीवर कृती समिती ठाम असल्याचे प्रा. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम (विशेष प्रकल्प) मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी करण्याचे ठरले. दरम्यान, बुधवारी मंत्री शिंदे यांची बैठकीसाठी वेळ घेण्यात येणार आहे.

Web Title: Increase the rights of the evaluation committee