शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वत्र वादावादीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर पहिली लस घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रात एकच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ...

कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर पहिली लस घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रात एकच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुईकर काॅलनी, फिरंगाई, राजारामपुरी आदी ठिकाणी लसीकरणासाठी उभारलेल्या नागरिकांमध्ये वादावादीचे चित्र होते. रांगेत उभारूनही टोकन न मिळाल्याने अनेकांचा संताप चेहऱ्यावर दिसून येत होता.

गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन कोरोनापासून बचाव होण्यासाठी ४५ वर्षांवरील लोकांकरिता लसीकरण मोहीम जोरदारपणे राबवत आहे. पहिले काही दिवस लोकांना या लसीकरणाचे महत्त्व वाटले नाही. त्यामुळे अनेकांनी आता घेऊ, नंतर घेऊ असे करीत टंगळमंगळ केली. त्याचा परिणाम म्हणून संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेकजण सावध झाले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लस टोचून घेण्यासाठी एकच गर्दी करू लागले आहेत. येणाऱ्यांची संख्या आणि लसी यांचे गणित जुळेनासे झाले आहे. शिल्लक असेल तर टोकन मिळत होते. नाही तर तासन्‌ तास रांगेत उभारूनही, लस तर मिळाली नाहीच, उलट मनस्ताप झाला, अशी प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळाली.

दुपारी एक वाजता सावित्रीबाई फुले रुग्णालयात २०० जणांकरिता लस उपलब्ध होती. मात्र, रांगेत उभारलेल्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडले. अशीच परिस्थिती रुईकर काॅलनीतही होती. तेथेही अनेकजण रांगेत उभारले होते. त्यांना लस नाही, पण जे थेट रांगेविना आतमध्ये गेले, त्यांना लस मिळाली; अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

ऑनलाईन टोकन द्या

महापालिका

फोटो : २२०४२०२१-कोल-सावित्रीबाई फुले ०१,०२,०३

ओळी : कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात गुरुवारी लस टोचून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

(छाया : आदित्य वेल्हाळ )