अंबाबाई-जोतिबा मंदिरातील दर्शन वेळेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 20:10 IST2020-12-28T20:08:41+5:302020-12-28T20:10:25+5:30

Mahalaxmi Temple Kolhapur- अंबाबाई, जोतिबासह समितीच्या अखत्यारीतील मंदिरांची दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

Increase in darshan time at Ambabai-Jotiba temple | अंबाबाई-जोतिबा मंदिरातील दर्शन वेळेत वाढ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी धनाजी जाधव, आमदार चंद्रकांत पाटील, राजू जाधव उपस्थित होते.

ठळक मुद्देअंबाबाई-जोतिबा मंदिरातील दर्शन वेळेत वाढदेवीचे दर्शन आता सकाळी सात ते रात्री आठ

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबासह समितीच्या अखत्यारीतील मंदिरांची दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

देवस्थान समितीची बैठक मुख्य कार्यालयात पार पडली. यावेळी श्री अंबाबाई, जोतिबा, दत्त भीक्षालिंग, ओढ्यावरील सिध्दिविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरांतील दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समितीच्या अधिपत्याखालील अन्य मंदिरांच्या वेळेसंदर्भात स्थानिक उपसमितीच्यावतीने निर्णय घेतला जाईल.

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंदिरातील विकास कामांची माहिती दिली. समितीच्यावतीने जाधव यांनी देवीची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. यावेळी समिती सदस्य राजेंद्र जाधव, अशोक देसाई, तुषार देसाई व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Increase in darshan time at Ambabai-Jotiba temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.