सोळा गुंठ्यांत दोन लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:18+5:302021-01-22T04:21:18+5:30
बाबासाहेब नेर्ले गांधीनगर : स्वत: सिव्हिल इंजिनिअर...मात्र, नोकरीपेक्षाही जास्त पैसे शेतीतून मिळवण्याचा ध्यास घेत चिंचवाड (ता. करवीर) येथील युवा ...

सोळा गुंठ्यांत दोन लाखांचे उत्पन्न
बाबासाहेब नेर्ले
गांधीनगर : स्वत: सिव्हिल इंजिनिअर...मात्र, नोकरीपेक्षाही जास्त पैसे शेतीतून मिळवण्याचा ध्यास घेत चिंचवाड (ता. करवीर) येथील युवा शेतकरी स्नेहलकुमार नेमगोंडा पाटील यांनी सेंद्रिय शेतीची कास धरत भाजीपाला पिकांतून अवघ्या तीन महिन्यांत सोळा गुंठ्यात दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पाटील यांनी आपल्या सोळा गुंठ्यातीत शेतात काकडी, बीट, बटाटे, झेंडूच्या फुलांची लागवड केली. रासायनिक खतांचे दुष्परिणाम जाणल्याने त्यांनी या सर्वच पिकांना सेंद्रिय खतांची मात्रा दिली. विशेष म्हणजे घरातीलच पाळलेल्या देशी गाईचे शेण व गोमूत्रापासून जीवामृत, दशपर्णी यार्क, नीम ऑईल यापासून त्यांनी सेंद्रिय खत तयार केले. यामुळे पिकांची वाढही जोमाने झाली. हा सर्वच भाजीपाला रसायनविरहित असल्याने त्यांच्या शेतातील भाजीपाल्याला मोठी मागणी होती. यातून त्यांनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.