मोबाईल स्टेटसवरुन एकास काठीने मारहाण,चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 16:19 IST2020-02-26T16:14:05+5:302020-02-26T16:19:31+5:30
मोबाईलवर ‘फिलींग हॅप्पी’ असे स्टेटस लावल्याने चिडून एकास काठ्या, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार क्रशर चौक ते सानेगुरुजी वसाहत मार्गावर घडला. हिंमतराज प्रकाश चौगले (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.

मोबाईल स्टेटसवरुन एकास काठीने मारहाण,चौघांवर गुन्हा
कोल्हापूर : मोबाईलवर ‘फिलींग हॅप्पी’ असे स्टेटस लावल्याने चिडून एकास काठ्या, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार क्रशर चौक ते सानेगुरुजी वसाहत मार्गावर घडला. हिंमतराज प्रकाश चौगले (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंमतराज चौगले यांनी आपल्या मोबाईल ‘फिलींग हॅप्पी’ असे स्टेटसवर लावले होते, या कारणांवरुन विजय पांडूरंग बाडकर, ऋषीकेश आनंदा बाडकर (दोघेही रा. निगवे, दुमाला, ता. करवीर) व अनोळखी दोन मुलांनी हिंमतराज यांच्यावर काठीने हल्ला केला.
संशयीतांनी काठीने बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. यामध्ये हिंमतराज यांच्या पाठीवर व पायावर गंभीर दुखापत झाली आहे, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विजय बाडकर, ऋषीकेश बाडकर यांच्यासह अनोळखी दोन तरुण अशा एकूण चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.