शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर कर्जमाफीचा प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुरंबे : महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तुरंबे : महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला प्रोत्साहनपर कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.

अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे माजी उपसभापती अरुण मारुतीराव जाधव यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित युवक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते.

यावेळी कोरोना योद्धा व माजी सैनिकांचा सत्कार, कोरोना लसीकरण, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रास्ताविक दादासोा पाटील यांनी केले. शंभूराजे देसाई म्हणाले, कोरोना संकट थोपवण्यात राज्य सरकारची पहिली दोन वर्षे गेली, सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असताना काटकसर करत सर्वाधिक निधी कोरोना संकट थोपविण्यासाठी खर्च केला. त्यामुळे कोरोना रोखण्यात राज्य सरकार यशस्वी झाले, केंद्राकडून राज्याला अद्याप साडेबत्तीस हजार कोटी येणं आहे तरीही प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, अरुण जाधव हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांच्या विचारांचा वारसा जपत लोकांची सेवा करण्याचे काम करण्याची जबाबदारी यशस्विपणे त्यांनी पेलली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून व जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतिपदाच्या माध्यमातून अरुण जाधव आणि वंदना जाधव यांच्यातील सामाजिक दृष्टिकोन अधोरेखित होतो.

अरुण जाधव म्हणाले १९९० ला तळाशीचा सरपंच झालो तेव्हापासून आतापर्यंत राजकारणात कधीही मागे वळून बघितले नाही. वडिलांच्या ‘शब्दा’पुढे कधी गेलो नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे भाषण झाले. ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांनी माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा आढावा घेतला. बाबुराव देसाई, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, दत्तात्रय उगले, अभिजित तायशेटे, अर्जुन आबिटकर, नंदकिशोर सूर्यवंशी, शामराव भावके, अशोकराव फराकटे, प्रकाश पाटील, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब नवणे, धैर्यशील भोसले, अविनाश चिंदगे, विश्वनाथ तहसीलदार उपस्थित होते

मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी......

हसन मुश्रीफ यांच्यावर वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखी मर्यादेच्या पलीकडे जाऊन राजकीय चिखलफेक सध्या सुरू आहे. त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे. शेवटी राजकारण म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्वाचे व्यासपीठ नाही म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडी सरकारचा आमदार या नात्याने आम्ही मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत आहोत, असे प्रकाश आबिटकर म्हणाले.

२१ आबिटकर

फोटो ओळी

अर्जुनवाडा येथे अरुण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आमदार प्रकाश आबिटकर, वंदना जाधव, विजय देवणे, अभिजित तायशेटे, मारुतीराव जाधव.