अडकूरमध्ये भात खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:31+5:302021-01-23T04:24:31+5:30
चंदगड : चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी चंदगड तालुका कृषी माल फलोत्पादन सहकारी संघ दाटे या संघाने, ...

अडकूरमध्ये भात खरेदी केंद्राचे उद्घाटन
चंदगड : चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी चंदगड तालुका कृषी माल फलोत्पादन सहकारी संघ दाटे या संघाने, अडकूर येथे शासनाने भात खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे, याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव रेंगडे यांनी केले. अडकूर (ता. चंदगड) येथे भात खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई होते. शुभारंभप्रसंगी ४ शेतकऱ्यांचे ५० क्विंटल भात खरेदी करण्यात आले.
शासनाने जाहीर केलेली आधारभूत भात खरेदी किंमत प्रति क्विंटल १८६८ रुपये आहे. महाराष्ट्र शासन प्रति क्विंटल ७०० रुपये अनुदान लवकरच जाहीर करणार असून शेतकऱ्यांना एकूण २५६८ रुपये मिळणार आहेत. संभाजीराव देसाई यांनी, भाताबरोबर नाचणी व काजूही हमीभाव दारामध्ये खरेदी करण्याची मागणी केली.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी अनिल देसाई यांनी, शेतकऱ्यांच्या भाताचे पैसे वेळेत बँक खात्यावर जमा होणार असल्याचे सांगून, जास्तीत जास्त भात खरेदी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गडहिंग्लजचे पं. स. सदस्य विद्याधर गुरबे, चंदगडचे माजी सभापती बबन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. मानसिंग देसाई, पांडुरंग जाधव, महादेव गावडे, राजू देशपांडे, रामू गावडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
संघाचे अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. धनाजी देसाई यांनी आभार मानले.
फोटो ओळी :
अडकूर (ता. चंदगड) येथे ओमसाई काजू कारखान्यात शासनमान्य भात खरेदी केंद्राचा प्रारंभ उदयकुमार देशपांडे, संभाजीराव देसाई, विद्याधर गुरबे, रेगडे व देसाई आदींच्या उपस्थितीत झाला. क्रमांक : २२०१२०२१-गड-०१