शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा ‘भाजप’कडूनही अभ्यास; महायुतीच्या यशासाठी असाही एक फॉर्म्युला

By समीर देशपांडे | Updated: December 20, 2025 15:54 IST

सविस्तर चर्चेनंतर निर्णय

समीर देशपांडेकोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य, आरपीआयसह महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी भाजपने वेगळाच फॉर्म्युला आणला आहे. आपल्याच पक्षाच्या आणि पक्षाशी संबंधित प्रमुख नेत्यांना भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या नावांसह सर्वच्या सर्व ८१ जागांवर कोण उमेदवार असावेत याची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काहींनी त्यांच्या याद्या शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादरही केल्या आहेत.यंदा पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभागाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे अनेकांचे पारंपरिक बालेकिल्ले अडचणीत आले आहेत. केवळ जुन्या एका प्रभागात मते घेऊन चालणार नाही तर उर्वरित तीन प्रमुख भागांमध्येही विजयासाठी मते मिळविण्याची गरज आहे. त्यामुळे जोडीला असणारे उमेदवारही तितकेच तोलामोलाचे आवश्यक आहेत.

जर मित्रपक्षांतील कोणीही उमेदवार देताना कार्यकर्त्याला संधी द्यायचीच म्हणून निवडून येण्याची क्षमता नसलेला उमेदवार दिला तर त्याचा फटका महायुतीच्या इतर उमेदवारांनाही बसू शकतो.हाच विचार करून मंत्री पाटील यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील यांना वेगवेगळ्या याद्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार यातील काहींनी याद्या तयार करून मंत्री पाटील यांना प्रत्यक्ष भेटीत दिल्याही आहेत.

अनेकांकडून एकच नाव आले तर काम फत्तेएखाद्या प्रभागातून भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे कोण कोण उमेदवार असावेत अशी चार नावे सर्वांनी दिली आहेत किंवा द्यायची आहेत. ती अभ्यास करून वास्तव समजून द्यायला सांगितली आहेत. त्यामुळे या सर्वांच्या यादीत महायुतीमधील इच्छुकांची जर समान नावे असतील तर तो त्या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी साहजिकच सक्षम समजला जाईल, असा निष्कर्ष काढण्यास वाव आहे.

वेळेची बचतसगळ्यांनी सगळ्या याद्या घेऊन काथ्याकूट करून वेळ घालवण्यापेक्षा अनेकांकडून ज्याच्या नावाला पसंती ते नाव निश्चित करून तो निर्णय लवकर घेता येईल. तसेच यातून बचत झालेला वेळ हा वादाच्या जागांवरील तिढा सोडवण्यासाठी वापरता येईल असा यामागील उद्देश आहे.त्या पक्षाचे नेतेच घेणार निर्णयजरी भाजपच्या यादीत कोणाचेही नाव असले तरी हे उमेदवार जिंकून येऊ शकतात असे सांगण्यापुरती ही नावे असतील परंतु ती नावे निश्चित करण्याचा अधिकार हा पूर्णपणे त्या-त्या पक्षाच्या प्रमुखांनाच राहणार आहे. भाजपकडून फक्त याबाबतीत वेळेची बचत आणि मजबूत उमेदवारांच्या नावांवर एकमत होण्यासाठी हा फॉर्म्युला असल्याचे सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: BJP seeks winning formula for 2026 municipal elections.

Web Summary : BJP strategizes for Kolhapur's 2026 municipal elections, tasking leaders to identify potential candidates across Mahayuti parties. The aim is to ensure strong contenders and maximize the alliance's chances of victory in the four-member ward system.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीBJPभाजपाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे