शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेस देणार ४० नवे चेहरे, पहिल्या दिवशी १३५ जणांनी दिली मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:12 IST

'या' प्रमुखांनी दिल्या मुलाखती, दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जाणार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस एकूण जागांपैकी निम्म्या जागांवर नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देणार आहे. म्हणजेच ८१ जागांपैकी ४० जागांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली.पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ ते १० अशा दहा प्रभागांमधील १३५ इच्छुकांनी मुलाखती देत काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांचे प्रभागातील काम, जनसंपर्क, पक्षामधील कार्य या स्वरुपात मुलाखती झाल्या. गत सभागृहात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यानंतरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार प्रभाग क्रमांक १ ते १०मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दुपारी १:०० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत झाल्या. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी काँग्रेसकडे ३५०हून अधिक जणांनी उमेदवारांची मागणी केली आहे. एका एका प्रभागात डझनभरहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागणार आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, विक्रम जरग, तौफीक मुल्लाणी, भारती पोवार यावेळी उपस्थित होते.आजही मुलाखती होणारप्रभाग क्रमांक ११ ते २०मधील इच्छुकांच्या मुलाखती आज बुधवारी सकाळी ९:०० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटप झाल्यानंतर दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जाणार आहेत....या प्रमुखांनी दिल्या मुलाखतीसुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, संदीप नेजदार, माधुरी लाड, स्वाती यवलुजे, माणिक पाटील, राजाराम गायकवाड, अर्जुन माने, प्रकाश पाटील, मंगल चव्हाण, कैलास गौडदाब, जय पटकारे, अफजल पीरजादे, धनजंय सांवत, उमा बनछोडे, श्रीकांत बनछोडे, इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, प्रताप जाधव, दीपा मगदूम.

महापालिका निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. यावेळी एकूण जागांपैकी ५० टक्के नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. पाच - सहा दिवसांत उमेदवार निश्चित केले जातील. - सतेज पाटील, गटनेते, विधानपरिषद, काँग्रेस

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election 2026: Congress to Field 40 New Candidates

Web Summary : Congress plans to field new faces in Kolhapur Municipal elections. Interviews for candidates began with 135 aspirants. Half of the 81 seats will be allocated to fresh candidates. Final candidates will be decided after seat allocation.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील