शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

..तर महाडिक यांच्या नावावर कारखान्याचा सातबारा, सतेज पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 12:04 IST

..यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ

कसबा बावडा : राजाराम कारखान्यात जर येत्या निवडणुकीत परिवर्तन झाले नाही आणि कारखान्याचा कारभार सुधारला नाही, तर येणाऱ्या काळात कारखान्याच्या सातबाऱ्यावर माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव लागेल, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.कारखान्याच्या सभासदांमध्ये सध्या परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे राजाराम कारखाना पुन्हा एकदा सहकारी करायचा आहे. हा कारखाना गेली २५ वर्षे खाजगी झाला आहे. त्यासाठीचा हा लढा असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. राजाराम कारखान्याची येत्या ३० सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.पाटील म्हणाले की, बाहेरच्या बोगस सभासदांमुळे मागच्या निवडणुकीमध्ये शंभर दीडशे मतांपासून ते अडीचशे मतापर्यंत आघाडीचे पॅनल मागे पडले होते. आता मात्र न्यायालयीन लढाईनंतर अखेर या बोगस सभासदांचे सभासदत्व रद्द झाले आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी संचालक बाबासाहेब देशमुख, जयसिंग हिर्डेकर, ॲड. प्रल्हाद लाड, रघुनाथ चव्हाण, राजू बेनाडे, प्रल्हाद शिरोटे, डॉ. मोहिते, मोहन सालपे उपस्थित होते.

महाडिकांचे प्रेम बेडकीहाळवर

बेडकीहाळ येथे महाडिक यांनी स्वतःच्या खाजगी कारखान्यात सहवीज निर्मिती, इथेनॉल प्रकल्प उभे केले. गाळप क्षमता १७ हजार मे. टनांपर्यंत नेली; पण राजाराम कारखान्याची प्रतिदिन ५ हजार गाळप क्षमता करूनसुद्धा ३२०० मे. टनाच्या वर कधी गाळप झाले नाही. याबाबत त्यांनी कधी विचारच केला नाही. त्यांचे सर्व लक्ष बेडकीहाळवर असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.

सभासद चिवड्याच्या पाकिटाला भुलणार नाही

वार्षिक सभेमुळे चिवड्याची पाकीट आता घरपोच येत आहेत. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. इथला सभासद घरपोच चिवड्याच्या पाकिटाला भुलणार नाही. हे दाखवण्याचे काम आता करावे लागणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

आता गप्प बसायचे नाही...

राजारामची सभा आम्ही शांततेत घेणार आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. आम्हाला काही वाद करायचा नाही. सभेत कोणी येऊन दंगा करणार असेल. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे न देता सभा उधळून लावणार असतील, एखाद्याला टार्गेट करणार असतील तर मग गप्प बसायचे नाही. तसल्या भानगडीत पडू नका, असा इशारा सतेज पाटील यांनी महाडिक समर्थकांना दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिकSugar factoryसाखर कारखाने