शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

कोल्हापूर ते माणगाव आंबेडकर सन्मान रॅली, इंडिया आघाडीचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:40 IST

११ फुटी उंचीचा पुतळा..

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ येत्या रविवारी (दि. २९ डिसेंबर) इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापूर ते माणगाव अशी दोन हजार मोटरसायकलस्वारांची रॅली काढण्याचे नियोजन गुरुवारी येथे बैठकीत झाले. सकाळी ९.३० वाजता ही रॅली दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल. रॅलीचा समारोप डॉ. आंबेडकर यांना माणगाव येथे अभिवादन करून करण्यात येणार आहे.संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक जे वक्तव्य केलेले होते, त्याचा निषेध बिंदू चौकात धरणे आंदोलन करून करण्यात आला. तेव्हाच अशी रॅली काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याच्या नियोजनासाठी बैठक झाली. निमंत्रक आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते. त्यांनी खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढणार असल्याचे सांगितले. या सन्मान रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने मोटारसायकली सामील झाल्या पाहिजेत, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले. जिल्ह्यातील संविधानप्रेमी सर्व आम जनतेने दसरा चौकात मोटारसायकलसह उपस्थित रहावे, असे आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात आले. बैठकीस विजय देवणे, सचिन चव्हाण, दिलीप पवार, उदय नारकर, सुनील मोदी, व्यंकाप्पा भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

११ फुटी उंचीचा पुतळा..रॅलीमध्ये मार्गावरील सर्व गावातील नागरिक सहभागी होणार आहेत. रॅलीच्या सुरुवातीला आंबेडकर यांचा ११ फूट उंचीचा पुतळा असणार आहे. माणगाव येथे डॉ. आंबेडकर यांचा सन्मान करणारा ठराव मांडून या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस