शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'करवीर' अपहारातील तिघांच्या घराची झडती, गुन्ह्यात एकूण ३४ आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:30 IST

बँक खाती, मालमत्ता, पतसंस्थेशी संबंधित कागदपत्रे जप्त

कोल्हापूर : करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी (दि. २५) अटकेतील तीन आरोपींच्या कुरुकली (ता. करवीर) येथील घराची झडती घेतली. सुमित पांडुरंग परीट, सुयोग पांडुरंग परीट आणि शुभम एकनाथ परीट (तिघे रा. कुरुकली) अशी घर झडती झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या घरातून बँक खात्यांचे पासबुक, मालमत्तांची कागदपत्रे आणि पतसंस्थेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली.करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने २४ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी दाखल झाला होता. याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास अधिकारी उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपासाची सूत्रे स्वीकारताच चार आरोपींना अटक केली आहे.

यातील सुमित परीट, सुयोग परीट आणि शुभम परीट यांच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान बँक खात्यांचे पासबुक, परीट कुटुंबीयांनी खरेदी केलेल्या मालमत्तांची कागदपत्रे आणि पतसंस्थेशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. चौथा आरोपी ईर्षाद अल्लाबक्ष देसाई (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याची पोलिस कोठडीत रवानगी झाली असून, त्याच्याही घराची झडती घेतली जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.गुन्ह्यात एकूण ३४ आरोपीया गुन्ह्यात एकूण ३४ आरोपी आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ३३ पैकी १४ आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. चौघांना अटक झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.मालमत्तांचा शोध घेणारअटकेतील आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे. आरोपींनी गेल्या वर्षभरात विकलेल्या मालमत्ता जप्त केल्या जातील, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. तसेच आरोपींच्या वादग्रस्त मालमत्तांची कोणीही खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.जप्तीसाठी प्रस्ताव सादर होणारएमपीआयडी कायदा १९९९ अंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे. गुन्हा दाखल असलेल्या सर्व आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या तातडीने जप्त केल्या जातील. मंजुरीनंतर लिलाव प्रक्रियेने मालमत्तांची विक्री होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Raids in 'Karveer' Embezzlement Case, 34 Accused Total

Web Summary : Raids occurred at three accused's homes in the Karveer embezzlement case. Bank documents and property papers were seized. The scam involves ₹24.69 crore, with 34 total accused. Police are searching for remaining suspects and plan to seize assets.