शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा, कुणाची गय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्यावर्षी कोल्हापुरात कोरोना काळात जेवढे चांगले काम झाले तेवढे दुसऱ्या लाटेवेळी झालेले नाही. लोकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्यावर्षी कोल्हापुरात कोरोना काळात जेवढे चांगले काम झाले तेवढे दुसऱ्या लाटेवेळी झालेले नाही. लोकांना अजिबात गांभीर्य दिसत नाही म्हणून निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा. कुणाचीही गय करू नका, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिला.

पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नमुना तपासण्यांची संख्या वाढवा, बाधित दर अधिक असणाऱ्या गावांमधील सर्व नागरिकांच्या तपासण्या करुन घ्या, सध्या आठ ते दहा हजार चाचण्या होत आहेत. त्या दीडपट किंवा दुप्पट करा. पहिल्या लाटेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम केले. आम्हांला फोन यायचे. कोल्हापुरात सोडत नाहीत म्हणून. मग आता असे काय झाले. जे ठरवले आहे त्याची कडक अंमलबजावणी करा. लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाला मुभा द्यावी. त्यांच्या कामात अडथळा नको. जनरल प्रॅक्टिशनर्स यांच्याशीही बोलून घ्या. ज्यांना त्रास आहे त्यांनी किरकोळ औषधे, गोळ्या न घेता आवश्यक उपचार घेतले पाहिजेत.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, प्रथम दर्शनी कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, गगनबावडा, शिरोळ तालुक्यामध्ये कोरोनाचा रुग्णदर अधिक आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी या तालुक्यात मृत्युदर अधिक आहे. लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ही चांगली बाब आहे. महाआयुष ॲप, संजीवनी अभियान जिल्ह्यात चांगल्याप्रकारे राबविण्यात येत आहे. कोविड पश्चात सेवा, मृत्युदराचे ऑडिट करून त्रुटी दूर करा. सीपीआर व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे.

जिल्हाधिकारी देसाई यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या उपाययोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक मागण्या केल्या व आभार मानले.

----------------

पवार यांचा धसका..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सध्याचे निर्बंध शिथिल करा म्हणून विनंती करण्यासाठी काही व्यापारी संघटनांचे पदाधिकारी गेले होते. परंतु पवार यांचा बैठकीतील नूर पाहून त्यांना मागण्यांचे निवेदन द्यायचे धाडस झाले नाही. त्यामुळे नेलेेले निवेदन खिशात ठेवूनच परत यावे लागले.

साखर कारखाने काय करतात..?

घरी रुग्ण रहात असल्यामुळे अनेकजण बाधित होत आहेत. मग संस्थात्मक अलगीकरण का केले जात नाही अशी विचारणा पवार यांनी केली. जिल्ह्यात एवढे साखर कारखाने आहेत त्यांनी काय केले असा सवालही पवार यांनी विचारला.

चौकट

उपमुख्यमंत्री पवार काय म्हणाले,

१.बाधित रुग्णांकडून संसर्ग फैलावू नये, यासाठी संस्थात्मक अलगीकरण प्रभावीपणे करा.

२. परराज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची सक्तीने तपासणी करा.

३. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांसाठी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करा.

४.सीपीआर, इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसाठी निधी देणार.

५.रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल, ऑक्सिजन ऑडिट करून घेऊन त्रुटी दूर करा.