सुधारित : आजऱ्यातील विवाहितेची नैराश्येतून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:36+5:302020-12-05T04:56:36+5:30

कोल्हापूर : येथील आर. के. नगरातील हरी पार्कमध्ये भाडेकरू म्हणून राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ...

Improved: Depressed woman commits suicide due to illness | सुधारित : आजऱ्यातील विवाहितेची नैराश्येतून आत्महत्या

सुधारित : आजऱ्यातील विवाहितेची नैराश्येतून आत्महत्या

कोल्हापूर : येथील आर. के. नगरातील हरी पार्कमध्ये भाडेकरू म्हणून राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. धनश्री आप्पा जाधव (वय २५, सध्या रा. आर. के. नगर, मूळ गाव एरंडोळ, ता. आजरा) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, आर. के. नगरमध्ये उदय पालकर यांच्या घरामध्ये धनश्री जाधव गेले तीन वर्षे नोकरीच्या निमित्ताने भाडेकरू म्हणून राहत होत्या. त्या शहरातील एका बँकेत क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम करत होत्या. बुधवारी रात्री त्यांनी राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला असलेल्या फॅनला वायरीने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तिच्या रूमची तपासणी केली असता तेथे त्यांची रोजनिशीची डायरी सापडली. त्यामध्ये त्यांनी आयुष्याबाबत निराशाजनक लेखन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसून येते. आत्महत्येची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली.

(तानाजी)

Web Title: Improved: Depressed woman commits suicide due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.