शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा वंचितांसाठी ‘क्वॉलिटी सर्कल’ - मराठा महासंघाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 01:33 IST

उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृ षी अशा विविध क्षेत्रांतील अनुभवी, गुणवत्तापूर्ण व्यक्तींचा संग्रह (क्वॉलिटी सर्कल) तयार करून त्याद्वारे मराठा समाजातील वंचित, दुर्बलांचा विकास साधण्याचा निर्णय शुक्रवारी येथे घेण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्हानिहाय मेळावे, जात प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन,

ठळक मुद्देराजर्षी शाहू मराठा महोत्सव

कोल्हापूर : उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृ षी अशा विविध क्षेत्रांतील अनुभवी, गुणवत्तापूर्ण व्यक्तींचा संग्रह (क्वॉलिटी सर्कल) तयार करून त्याद्वारे मराठा समाजातील वंचित, दुर्बलांचा विकास साधण्याचा निर्णय शुक्रवारी येथे घेण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्हानिहाय मेळावे, जात प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन, आदींबाबत ठराव करण्यात आले असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी दिली.येथील मराठा महासंघाचे कोल्हापूर शाखा आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात महासंघाची राज्यस्तरीय बैठक झाली. शाहू स्मारक भवनमधील या बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप प्रमुख उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस कोंढरे म्हणाले, शून्यातून विश्व निर्माण केलेल्या मराठा समाजातील बांधवांनी दुर्बल, वंचितांना विकासासाठी मार्गदर्शन करावे, यासाठी क्वॉलिटी सर्कलची स्थापना केली जाईल. या सर्कलची स्थापना पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनुभवी, गुणवत्तापूर्ण व्यक्तींचा संग्रह, संघटन केले जाणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे होत आहेत. थकबाकी हमीला मान्यता दिली आहे. युवक आणि बँकांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी महासंघाने पार पाडावी. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवार म्हणाले, आरक्षण मिळाले म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मराठा समाजाने मरगळ झटकून कामाला लागावे. यावेळी योगेश नाटकर, आतिष गायकवाड, महेश सावंत, अवूधत पाटील, आदी उपस्थित होते.आर्थिक महामंडळाच्या योजनेबाबत मार्गदर्शनया महोत्सवात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थी कर्ज योजनेबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हा समन्वयक सतीश माने आणि चार्टर्ड अकौंटंट नितीन हरगुडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किशोर माने, शैलेजा भोसले, रामचंद्र पवार, दिलीप सावंत उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, महामंडळाच्या योजनांचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा. उपाध्यक्ष पवार म्हणाले, महामंडळाच्या योजना युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. जिल्हा समन्वयक माने यांनी महामंडळाच्या योजनांची, तर चार्टर्ड अकौंटंट हरगुडे यांनी प्रस्ताव तयार करण्याबाबतची माहिती दिली.वसतिगृहाचा लाभ घ्यावाऔंध (पुणे) येथील ‘आयटीआय’च्या परिसरात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. त्याठिकाणी १५९ जागा रिक्त आहेत. कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोंढरे यांनी केले आहे. ते म्हणाले, सन १९२० पूर्वीची कागदपत्रे असणाऱ्या बांधवांनी मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढावे. ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले नाहीत त्यांनी मराठा जात प्रमाणपत्र काढावे.अन्य ठराव असे‘सारथी’ संस्थेचे काम शिवजयंतीपूर्वी सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.महासंघाचे जिल्हानिहाय मेळावे फेब्रुवारीपासून घेणे.दुष्काळग्रस्त भागातील बांधवांसाठी विविध संस्था, समितींद्वारे मदत करणे.मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिरे घेणे.विद्यार्थ्यांसाठी मराठा शिष्यवृत्ती फंड निर्माण करणे.कोल्हापुरात शुक्रवारी मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात महासंघाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून वसंतराव मुळीक, नरेंद्र पाटील, विनायकराव पवार, दिलीप जगताप उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर