राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:56 PM2021-04-09T17:56:23+5:302021-04-09T17:58:16+5:30

minister Farmer kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत असून ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून ठिबकला प्रोत्साहन देण्यासाठी ठिबक ऑटोमायझेशनला अनुदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

Implement saline land repair scheme under National Agricultural Development Plan | राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना राबवा

क्षारपड जमीन दुरुस्तीसह इतर मागण्यांचे निवेदन खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजीत मिणचेकर उपस्थित होते. 

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना राबवा धैर्यशील माने यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी : ठिबक ऑटोमायझेशनला अनुदान द्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत असून ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत क्षारपड जमीन दुरुस्ती योजना सुरू करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून ठिबकला प्रोत्साहन देण्यासाठी ठिबक ऑटोमायझेशनला अनुदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुसे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी ही मागणी केली. यावेळी माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार उपस्थित होते.

राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना आणली. त्याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना झाला. त्याचवेळी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली होती, त्यानुसार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे, त्याचबरोबर जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुराने नुकसान अद्याप काहींना मिळालेले नाही. त्याबाबतही आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी खासदार माने यांनी मंत्री भुसे यांच्याकडे केली.

Web Title: Implement saline land repair scheme under National Agricultural Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.