शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

‘रेडझोन’मधील बांधकामे त्वरीत थांबवा, पूरग्रस्त कृती समितीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 4:27 PM

कोल्हापूर शहरात आलेल्या पुराचे मुख्य कारण म्हणजे रेडझोन मधील बांधकामे आहेत. त्यामुळे येथील बांधकामे त्वरीत थांबवावीत, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी २०१९ पूरग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

ठळक मुद्दे ‘रेडझोन’मधील बांधकामे त्वरीत थांबवा पूरग्रस्त कृती समितीची निदर्शने :जिल्हा प्रशासनाला निवेदन

कोल्हापूर : शहरात आलेल्या पुराचे मुख्य कारण म्हणजे रेडझोन मधील बांधकामे आहेत. त्यामुळे येथील बांधकामे त्वरीत थांबवावीत, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी २०१९ पूरग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.महावीर उद्यान येथून ‘माकप’चे ज्येष्ठ नेते व कृती समितीचे निमंत्रक चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर निदर्शने सुरु करण्यात आली.

यावेळी आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. राजीव गांधी वसाहत, बापट कॅँप, जाधववाडी,शिरोली नाका, मुक्त सैनिक वसाहत आदी परिसरातील पूरग्रस्त महिला व नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.शिष्टमंळाने नायब तहसिलदार आनंद गुरव यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पुरबाधित कुटूंबांचे पंचनामे झाले परंतु स्थलांतरीत कुटूंबांचा अद्याप पैसे व धान्य मिळालेले नाही.पूरबाधित कुटूंबांना तातडीची ५००० सानुग्रह अनुदान मिळाले परंतु बॅँकेत जमा करावयाचे १० हजार रुपये अद्याप खात्यावर जमा झालेले नाही. ते त्वरीत करावे. पूरबाधित घराचे स्ट्रक्चरल आॅडीट करावे, बापट कॅँप-कुंभार वसाहत येथे पुरामुळे व्यावसाईकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना तातडीने भरपाईची घोषणा करावी. तसेच या ठिकाणी अद्याप पंचनाम्याचे काम झाले नसून ते त्वरीत करुन मदतीच्या रक्कमेची घोषणा करावी. पूरबाधित परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटूंबांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही ती त्वरीत द्यावी. स्ट्रक्चरल आॅडीटच्या अहवालाच्या आधारावर सर्व बाधित पुरग्रस्तांना पंतप्रधान आवास योजना लागू करावी. आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात प्रकाश सरवडेकर, मयूर पाटील, राजू लाटकर, शंकर काटाळे, लक्ष्मण वायदंडे आदींसह पूरग्रस्तांचा समावेश होता.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर