शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेडझोनमधील बेकायदेशीर अतिक्रमणे काढलीच पाहिजेत, विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार कडाडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:23 IST

कोल्हापूर महापालिकेला देणार सूचना

कोल्हापूर : कोल्हापुरातील महापुराला कारणीभूत ठरलेले पंचगंगा नदीकाठ परिसर तसेच जिल्ह्यातील नद्यांच्या पात्रातील, ब्ल्यू लाइन, रेडलाइनमधील बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामे पाडलीच पाहिजेत त्याबाबतची सूचना कोल्हापूर महापालिकेला केल्या जातील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी दिली. यंदा महापुराचे योग्य नियोजन केल्याबद्दल त्यांनी कोल्हापूरकरांच्या पूर व्यवस्थापन यंत्रणेला दाद दिली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण उपक्रमाच्या आढावा बैठकीसाठी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. बैठकीनंतर पुलकुंडवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूर्वी ज्या बांधकामांना परवानगी दिली गेली आणि नंतर तिथे ब्ल्यू लाइन व रेडलाइन झाली असेल, तर अशा कुटुंबांचे अन्यत्र पुनर्वसन करता येईल का किंवा त्यांना शहरात समाविष्ट करता येईल का, याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. मात्र, ब्ल्यू लाइन, रेड लाइन असतानाही बेकायदेशीर बांधकामे झाली असतील तर या अतिक्रमणांवर कारवाई झालीच पाहीजे. तशा सूचना महापालिकेला दिल्या जातील.शहरांसोबतच गावांमध्येही मोठ्या प्रमाणात नदीकाठावर अतिक्रमणे होत आहे या मोठ्या गावांची व्यापक बैठक घेऊन बेकायेशीर बांधकामे होणार नाहीत याबाबत सूचना द्या, असे त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सांगितले. कोल्हापूरला २०१९ व २०२१ साली ज्याप्रमाणे महापुराचा सामना करावा लागला तेवढी गंभीर परिस्थिती यंदा झाली नाही. अलमट्टीतून विसर्ग आणि कोल्हापूरकरांचे नियोजन यामुळे हे शक्य झाले.

राष्ट्रीय महामार्ग सोबत चर्चा करू..पुणे-बेंगलोर महामार्गाचे विस्तारीकरण करत असताना भराव टाकून पूल उभारण्यापेक्षा पिलर टाकून पूल तयार करावा या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे; पण अंमलबजावणीत तसे दिसत नाही यावर पुलकुंडवार म्हणाले, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू. पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या नदी जोड प्रकल्प दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

व्यवस्थित माहिती द्या..पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून बाधितांना वेळेत व विनासायास भरपाईची रक्कम मिळावी यासाठी पंचनामे करताना बाधितांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित माहिती द्यावी, विशेषत: अधार, बँक खात्याची माहिती, मोबाइल क्रमांक अशी अत्यावश्यक माहिती अचूक द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर