शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोढणे झालो असेन तर तसे सांगा..!-- लुटारूंना महायुतीत घेऊ नये

By admin | Updated: July 30, 2014 00:30 IST

शेट्टी यांनी युतीला ठणकावले : दलबदलूंना कडाडून विरोधच

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची विधानसभा निवडणुकीत गरज आहे की आमचे लोढणे झाले आहे, हे तरी एकदा त्यांनी स्पष्टपणे सांगावे, अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल, सोमवारी मुंबईत झालेल्या महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत केली. आम्ही लोढणे झालो असू, तर आमचा आम्हाला मार्ग मोकळा आहे. नंतर जागावाटपात पुढे जाऊन ऐनवेळी जमत नाही असे सांगू नका, असेही शेट्टी यांनी मुख्यत: शिवसेना व भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांना ठणकावले.मुंबईत झालेल्या या बैठकीस ‘स्वाभिमानी’तर्फे शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत, प्रा. जालंदर पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महायुती घडविण्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पुढाकार होता. त्यांच्याशी शेट्टी यांचे चांगले संबंध होते. शेट्टी यांची ताकद त्यांना माहीत होती; परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीकडून इतर घटकपक्षांबद्दल कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या घटकपक्षांना सगळ्या मिळून १५च जागा दिल्या जातील, अशा बातम्याही युतीच्या नेत्यांकडून पेरल्या जात आहेत. त्याबद्दलही शेट्टी यांनी सुरुवातीलाच विचारणा केली. तुमची १५ जागा देण्याची भूमिका असेल, तर आजच्या बैठकीत पुढे चर्चा करायलाच नको, असे त्यांनी म्हटल्यावर युतीच्या नेत्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला १५ हा आकडा खोटा असून, अजून किती जागा द्यायच्या, हा निर्णय कोणत्याच पातळीवर झाला नसल्याचे स्पष्ट केले. पहिलीच बैठक असल्याने त्यामध्ये जागावाटपाबाबत फारशी चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीत जे लोक महायुतीच्या थेट विरोधात काम करीत होते, त्यांना आता शिवसेना-भाजपने उमेदवारी देऊ नये, असा आग्रह बैठकीत शेट्टी यांनी धरला. आमची ताकद किती व काय आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे कुठपर्यंत थांबायचे हेदेखील आमचे ठरलेले आहे; परंतु महायुतीतील महत्त्वाच्या दोन पक्षांची भूमिका जर आम्हाला सन्मान देण्याची नसेल, तर विधानसभेला महायुती आकारास येण्यात अडचणी येतील, असे शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 

लुटारूंना महायुतीत घेऊ नयेगेल्या पंधरा वर्षांत दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करून सरकारला लुटले. त्यांची जनमानसातील प्रतिमा अत्यंत वाईट आहे. असेच काही नेते आता महायुतीचे सरकार येणार म्हटल्यावर उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अशा लोकांना सामान्य जनतेचा तीव्र विरोध आहे. झेंडा बदलून येणाऱ्या अशा भ्रष्ट नेत्यांना प्रमुख दोन्ही पक्षांनी महायुतीत घेऊ नये, अशी भूमिकाही शेट्टी यांनी बैठकीत मांडली.