शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार झाला असेल तर ‘गोकुळ’कडे चारशे कोटीच्या ठेवी कशा..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुरगूड : गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून विरोधक ओरड करत आहेत. भ्रष्टाचार झाला असेल, तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुरगूड : गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून विरोधक ओरड करत आहेत. भ्रष्टाचार झाला असेल, तर ‘गोकुळ’कडे चारशे कोटीच्या ठेवी आल्या कोठून, अशी रोखठोक विचारणा आमदार पी. एन. पाटील यांनी सोमवारी येथे केली. संघाच्या निवडणुकीतील सत्ताधारी शाहू आघाडीच्यावतीने राम मंगल कार्यालयात कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे होते.

आमदार पाटील म्हणाले, संस्था वाढवण्यासाठी, सभासदांना चांगला दर देण्यासाठी दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा प्रयत्न होता, मल्टिस्टेटच्या नावाने ओरड करणारे सांगतात को मल्टिस्टेट चांगले आहे, पण करणारी व्यक्ती चांगली नाही. हा ठराव संचालक विश्वास पाटील यांनीच आणला. मग कोण चांगलं आणि कोण वाईट हे दूध उत्पादकांनीच ठरवावे.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील जिल्ह्यातील वातावरण कलुषित करत आहेत. संघातील वाहतुकीचा खर्च ४९ कोटी आहे, पण या ठेक्यामध्ये महाडिकांनी ४०० कोटी मिळवले, असा आरोप ते करत आहेत. पण या वाहतूक नियोजनाचे प्रमुख विश्वास पाटीलच आहेत. मल्टिस्टेट करणारे तुमच्याकडे आहेत. या मल्टिस्टेटचा आरोप करणाऱ्यांनी मंडलिक कारखाना गोकुळच्या ठरावाच्या तिसऱ्या दिवशी मल्टिस्टेटच केला, हे विसरू नये.

समरजित घाटगे यांनी गोकुळचे व्यवस्थापन चांगले असल्याने पाठिंबा देत असल्याचे सांगून, या निवडणुकीला आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा कोणत्याही निवडणुकीला जोडू नका, असे स्पष्ट केले.

मेळाव्याचे आयोजक रणजित पाटील म्हणाले, गोकुळ हस्तगत करण्यासाठी टोळधाड आली आहे. अशा कित्येक धाडी आल्या, पण गोकुळ संघ टिकला, याचे कारण सभासदांना माहिती आहे. शेतकरी संघ, महालक्ष्मी दूध यांची अवस्था काय झाली, हे जरा पाहावे.

यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पी. एन. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत विश्वजित पाटील यांनी केले. सदाशिव मोरे यांनी प्रास्ताविक केले. मधुकर करडे यांनी आभार मानले.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, अंबरीश घाटगे, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विलास पोवार यांची भाषणे झाली. मेळाव्यास माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह सर्व उमेदवार दत्तात्रय खराडे, एम. एस. पाटील, यमगेचे सरपंच दिलीपसिंह पाटील, नगरसेवक धनाजी गोधडे, दत्तात्रय जाधव, अशोक खंडागळे, रामचंद्र भुते आदी उपस्थित होते.

चौकट

जेवणाचं बिल दाखवा...राजकारण सोडू

गोकुळ महादेवराव महाडिक किंवा पी. एन. पाटील यांच्या मालकीचा व्हावा, असा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही. उलट तो सभासदांचा राहावा यासाठी प्रयत्नशील राहिलो. गोकुळमध्ये माझ्या अथवा महाडिकांच्या नावावर जेवणाचे एखादे बिल दाखवा, कायमचे राजकारण सोडू, असे आव्हान पी. एन. पाटील यांनी दिले.

आमच्यासाठीच १४४ कलम का?

प्रचाराला जाणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवण्याचे प्रकार होत आहेत. मग हे मंत्री मागे दोन पुढे दोन पोलीस गाड्या लावून प्रचार करत आहेत. १४४ कलम फक्त आमच्यासाठीच आहे का, असा सवाल धनंजय महाडिक यांनी केला.

फोटो ओळ

मुरगूड (ता. कागल) येथे सोमवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या मेळाव्यात आमदार पी. एन. पाटील यांनी भूमिका मांडली. व्यासपीठावर बाळासाहेब खाडे, अमरसिंह घोरपडे, अनुराधा पाटील, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, धनंजय महाडिक, संजयबाबा घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.