घर मालक गोडसे असे वागले म्हणूनच तर त्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 11:41 IST2020-05-02T11:31:09+5:302020-05-02T11:41:28+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धनाजी गोडसे यांनी त्यांच्या भाडेकरूंचे एक महिन्याचे घरभाडे माफ करून त्यांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल ...

 If homeowners are like that ... will other homeowners behave like that? That's why homeowners! | घर मालक गोडसे असे वागले म्हणूनच तर त्यांचा

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाडेकरूंचे एक महिन्याचे घरभाडे माफ करणाºया श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे यांचा सत्कार कोल्हापूर शहर (महानगर) वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर यांनी केला.

ठळक मुद्देभाडेकरूंना दिलासा देणाऱ्या धनाजी गोडसे यांचा सत्कारसामाजिक बांधीलकी म्हणून गोडसे यांनी त्यांच्या भाडेकरूंचे एक महिन्याचे घरभाडे माफ केले आहे.असे घर मालक असतील तर... अन्य मालक असे वागतील का? म्हणूनच घरमालकांचा!

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धनाजी गोडसे यांनी त्यांच्या भाडेकरूंचे एक महिन्याचे घरभाडे माफ करून त्यांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल कोल्हापूर शहर (महानगर) वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर यांनी गोडसे यांचा सत्कार केला. गोडसे हे श्रीराम सोसायटीचे सभापती आहेत.

लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार थांबले असून आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. ते लक्षात घेऊन सामाजिक बांधीलकी म्हणून गोडसे यांनी त्यांच्या भाडेकरूंचे एक महिन्याचे घरभाडे माफ केले आहे.
 

Web Title:  If homeowners are like that ... will other homeowners behave like that? That's why homeowners!