शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’मधून इचलकरंजीस ६५४ कोटींची विकासकामे

By admin | Updated: October 1, 2015 23:23 IST

पाणीप्रश्न सुटणार : काळम्मावाडी नळ योजना होणार

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या अर्बन अटल मिशन फॉर रिज्युव्हेनशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेमध्ये इचलकरंजीचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरास मूलभूत सुविधा देणारी ६५४ कोटींची कामे नजीकच्या पाच वर्षांत होण्याची खात्री निर्माण झाली आहे.राज्यातील ४३ शहरांचा अमृत सिटी योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. इचलकरंजी शहरासाठी स्वच्छ व शाश्वत पाणी देणारी काळम्मावाडी धरणातून थेट नळ योजनेचा अमृतमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी काळम्मावाडीची किंमत ५३८.७७ कोटी रुपये इतकी गृहीत धरण्यात आली आहे. याशिवाय शहरातील शहापूर व कबनूर वाढीव वसाहतीमध्ये नळाच्या जोडण्या देणे. शंभर टक्के नळ योजनेचे मिटरिंग करणे. जुनी भुयारी गटार योजनेचे नळ बदलणे व शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप बदलणे. तसेच शहर बस वाहतूक योजना सुरू करणे आणि शहरामध्ये हरित पट्टा तयार करणे. या बाबींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.अमृत सिटी योजनेसाठी केंद्र सरकारकडून ३२७ कोटी रुपये व राज्य सरकारकडून १६३ कोटी रुपये असे अनुदान मिळणार आहे, तर नगरपालिकेला आपल्या हिश्श्यातील रक्कम १६३ कोटी रुपये घालावे लागणार आहेत. सरकारकडून मिळणारे अनुदान पाच वर्षांमध्ये समान पाच टप्प्यांत मिळणार असून, नगरपालिकेच्या हिश्श्याची दरवर्षी असणारी ३२ कोटी रुपयांची रक्कम नगरपालिकेला उभी करावी लागणार आहे. ही रक्कम दरवर्षी मिळणारा मालमत्ता कर वीस कोटी रुपये व पाणीपट्टी पंधरा कोटी रुपये यातून घेतली जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.सध्या नगरपालिका पंचगंगा व कृष्णा अशा दोन नद्यांतून पाण्याचा उपसा करते. दोन्ही नद्यांकडून सुमारे ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जाते. मात्र, या पाण्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने ४४ टक्के पाणी वाया जाते. शहरामधील नळांना शंभर टक्के मिटरिंग केले असता पाण्याची २५ टक्के बचत होईल. त्याचप्रमाणे शहर बस वाहतुकीसारखी सर्वसामान्यांना परवडणारी वाहतूक उपलब्ध झाल्यामुळे इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरातील कामगार वर्गाची चांगलीच सोय होणार असल्याचे डॉ. रसाळ यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)पुन्हा काळम्मावाडीचसाधारणत: एक महिन्यापूर्वी इचलकरंजी शहराचा अमृत सिटी योजनेमध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला असताना त्यावेळी काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणणारी खर्चिक नळ योजना ताबडतोब हाती घेऊ नये. ही योजना दीर्घ मुदतीची आहे. परिणामी याला पर्यायी व कमी खर्चाची नळ योजना सूचवावी, असे शासनाने सूचित केले होते. म्हणून काळम्मावाडीला पर्याय म्हणून सुळकूड (ता. कागल) येथून दूधगंगा नदीतून पाणी आणणारी अल्प खर्चाची योजना सुचविण्याच्या हालचाली नगरपालिकेत सुरू झाल्या होत्या. त्याबाबतची जोरदार चर्चा नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये झाली होती. तेव्हा दूधगंगा योजनेसाठी आजी-माजी खासदार व आमदार यांच्यासह बैठक घेण्यात येईल आणि त्याबाबत योग्य तो निर्णय केला जाईल, अशी ग्वाही शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी दिली होती. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी फक्त काळम्मावाडी योजनेचा प्रस्ताव शासनास दिल्यामुळे पालिका क्षेत्रात खळबळ उडाली होती.