शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत शिवजयंती उत्साहात

By admin | Updated: May 9, 2016 00:34 IST

शिवप्रेमींच्या भव्य मिरवणुका : ५४ मंडळांची एकत्रित मशाल मिरवणूक ठरली लक्षवेधी

इचलकरंजी : पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणारी शिवजयंती रविवारी शहर व परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच शहरातील विविध परिसरांमध्ये असलेल्या शिवप्रेमी मंडळांनी ज्योत घेऊन मिरवणुका काढल्या. भगवे फेटे, भगवे ध्वज घेतलेल्या युवकांनी गटागटाने मोटारसायकली मिरवणुका काढल्या. अशा प्रकारचा हा शिवजयंतीचा उत्सव अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला. युवा वर्गाचा उत्साह आणि मोटारसायकलींचा होणारा वापर पाहता पोलिसांनी शहर व परिसरात पहाटेपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता.दरम्यान, मंगळवार पेठेमधील ५४ विविध मंडळांनी एकत्र येऊन शनिवारी रात्री भव्य अशी मशाल मिरवणूक काढली होती. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक नागरिकांचे आकर्षण ठरली.पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या तरुणांचे मध्यरात्रीपासूनच शिवाजी पुतळा चौकात स्वागत करण्यात येत होते. शिवज्योत घेऊन येणारे शिवप्रेमी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत होते. दरम्यान, पहाटे पावणे सहाच्या सुमारास माजी मंत्री प्रकाश आवाडे व नगरसेवक रवी रजपुते यांच्या हस्ते शिवाजी पुतळा चौकातच असलेल्या स्वागत कक्षाचा प्रारंभ झाला. त्यांनी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांना भगवी टोपी देऊन स्वागत केले. यावेळी शिस्तबद्ध रितीने व शांततेने शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन आवाडे यांनी केले.दिवसभरामध्ये आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, आदींसह नगरसेवक-नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक मंडळे व क्रीडा मंडळांचे प्रमुख यांनी शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मध्यरात्रीपासून शिवजयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुका पाहता शिवप्रेमींचा उत्साह उदंड असल्याचे लक्षात येत होते. अशा या मिरवणुका रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.दरम्यान, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास शिवाजी पुतळा चौकातून संयुक्त मंगळवार पेठ मंडळाकडून मशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये दोनशे मशाली घेऊन पारंपरिक वेशात सहभागी झालेले युवक व नऊवारी साड्या परिधान करून भाग घेतलेल्या महिला व युवती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्ये होती. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे, जय मल्हार मालिकेचा देखावा, घोडेस्वार, उंट, रथ हे लोकांच्या आकर्षकाचे केंद्र होते. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास महात्मा गांधी पुतळा येथे आकर्षक आतषबाजी करून मिरवणुकीची सांगता झाली. चारा छावणीसाठी ४० हजार रुपयेशिवजयंती साजरी करण्यासाठी येथील स्वामी विवेकानंद कॉलनीमधील नागरिकांनी जमा केलेल्या देणगीपैकी ४० हजार रुपयांचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या दुष्काळ भागातील चारा छावणीला मंडळाकडून देण्यात आला. हा धनादेश कॉलनीचे अध्यक्ष सुजित कांबळे यांच्या हस्ते विहिंपचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांनी स्वीकारला. (प्रतिनिधी)हेर्लेत भव्य रॅलीहेर्ले : हेर्ले (ता. हातकणंगले) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पन्हाळागडावरून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन हातकणंगले पंचायत समितीचे सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावातील मुख्य मार्गावरून युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. झेंडा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याचे पूजन सभापती राजेश पाटील, शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष उपजिल्हाप्रमुख विजय भोसले, माजी उपसरपंच कपिल भोसले, महेश जाधव, शरद माने, अर्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कोडोलीत मिरवणूककोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे शिवजयंतीनिमित्त ढोल, ताशे, लेझीम या वाद्यांसह हत्ती, घोडे या लवाजम्यासह आतषबाजी करीत उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन केखले येथील शिवभक्त के . एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री विनय कोरे, सरपंच विद्यानंद पाटील, उपसरपंच नितीन कापरे, अमरबाबा पाटील, अशोकराव शंकरराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.गडहिंग्लज शहर बनले शिवमय