इचलकरंजीत पोलीस पैसे गोळा करतानाचा व्हिडीओ
By Admin | Updated: June 19, 2017 00:56 IST2017-06-19T00:56:19+5:302017-06-19T00:56:19+5:30
जिल्हा पोलीसप्रमुखांनी मागविला अहवाल

इचलकरंजीत पोलीस पैसे गोळा करतानाचा व्हिडीओ
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील वाहतूक शाखेकडील पोलीस कर्मचारी मोटारसायकलस्वारांकडून पैसे गोळा करीत असल्याची दृक्श्राव्य (व्हिडीओ) व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हा पोलीसप्रमुखांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्याकडे चौकशी अहवाल मागितल्याचे समजते.
मोटारसायकलस्वारांकडून वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक शाखेचे पोलीस कारवाई करीत असताना काही मोटारसायकलचालकांकडून चालक परवाना व पैसे जमा करून घेत आहेत आणि त्याबाबतची एकच पावती देत असल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायलर झाला. दरम्यान, या फितीबाबतची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी समजली असून, त्यांनी ही फीत तपासून त्याचा अहवाल येथील वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांनी द्यावा, अशा सूचना दिल्याचे समजते.