शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आयएएसला सारेच भुलले, तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 10:55 IST

Police Ratnagiri Kolhapur : रुबाबात वावरणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब अखेर रत्नागिरी पोलिसांनी उतरवला. अर्जुन श्यामराव सकपाळ असे त्याचे नाव आहे. त्याला रत्नागिरी पोलिसांनी ओणी (ता. राजापूर) येथून अटक केली.

ठळक मुद्देआयएएसला सारेच भुलले, तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश रत्नागिरीत त्याचा रुबाब उतरवला

तानाजी पोवारकोल्हापूर : जिल्हाधिकारी झाला म्हणून गावातून जल्लोषी मिरवणूकही काढली, त्यानंतर त्याची पतही उंचावली, गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे त्याने अनेकांना सांगितले. त्यामुळे त्याचा गावात राबताही कमी आला. वर्षातून अधूनमधून कधीतरी त्याचे या आलिशान मोटारीतून गावात दर्शन होऊ लागले. त्याचा उंचावलेला दर्जा पाहून कोल्हापुरातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलीचे गेल्याच वर्षी त्याच्याशी लग्न लावून दिले. अशा रुबाबात वावरणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब अखेर रत्नागिरीपोलिसांनी उतरवला. अर्जुन श्यामराव सकपाळ असे त्याचे नाव आहे. त्याला रत्नागिरीपोलिसांनी ओणी (ता. राजापूर) येथून अटक केली.महाराष्ट्र शासनाचे उपसचिवांच्या नावाने बनावट डिजिटल सहीचा वापर करून तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचा खोटा आदेश तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पत्रात त्याने आपलेच नाव घातले होते. त्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी पर्दाफाश करत त्याला गजाआड केले.कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उपवडे पैकी न्हाव्याचीवाडी हे अर्जुन सकपाळचे गाव आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची, घरही लहान, घरी दुभती जनावरे असे साधारण घरचे चित्र होते. अभ्यासात हुशार असून त्याचे शिक्षण बीपी.एड.पर्यंत झाले असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली; पण सात वर्षांपूर्वी त्याने शक्कल लढवली व आपण आयएएस परीक्षा पास झाल्याने जिल्हाधिकारी बनल्याचे सांगून गावातून जल्लोषी मिरवणूकही काढली. त्यानंतर त्याचा स्तर उंचावला. तो गावातून गायब झाला. त्यानंतर गुजरातमध्ये एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनल्याचे अनेकांना सांगितले. वर्षातून तीन-चार वेळा आलिशान मोटारीतून दिमाखात येत होता, काही तासांचा वावर दाखवून पुन्हा जात होता. त्याचे गावात मोजकेत मित्र होते.त्याच्या या रुबाबाला भुलून जिल्ह्यातील एक निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक बळी पडले, त्यांनाही त्याने आपण गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे भासवल्याचे समजते, त्यांच्या मुलीशी गेल्याच वर्षी त्याचा कोकणातील एका रिसॉर्टवर विवाह झाला आहे. त्याच रिसॉर्टवर रत्नागिरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.फुलेवाडी रिंग रोडवर आलिशन बंगलात्याची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याने फुलेवाडी रिंग रोडवर आलिशान बंगला गेल्याच वर्षी खरेदी केला आहे. गावाकडील दुभती जनावरे, शेती विकून त्याने भाऊ, आई-वडील यांना त्या बंगल्यात आणून ठेवले आहे.वारंवार फोन नंबर बदलण्याची सवयत्याचा गावाकडे मोजकाच मित्र परिवार आहे; पण मोठे बोलणे व अनेकांना तो जिल्हाधिकारी असल्याचेच सांगत असतो. काहींचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो आपला मोबाइल नंबर वारंवार बदलत असल्याचे त्याच्या गावातील काहींनी माहिती दिली.कोल्हापूर पोलिसांनाही चकवाकाही महिन्यांपूर्वी त्याने कोल्हापूर पोलिसांनाही आपण गुजरातमध्ये जिल्हाधिकारी आहोत, लवकरच रत्नागिरीत बदलून येतोय अशा भूलथापा मारून काही पोलिसांनाही चकवा दिल्याचे समजते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरी