शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:37 IST

विधान परिषदेचा आमदार भाजपचाच होणार

कोल्हापूर : आम्ही एकटे पडण्याचे अनेक प्रसंग आले. लोकसभेला माझा घात झाला. अमल आणि सम्राट यांचा पराभव झाला. ‘गोकुळ’मधील सत्ता गेली. विधानपरिषदही गेली. पण आम्ही निराश झालो नाही. टी.व्ही. फोडला नाही की गाव सोडून गेलो नाही, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला.नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षातील कामकाजाची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता ‘गाेकुळ’ महायुतीच्या ताब्यात येणार असून विधानपरिषदेचा आमदारही भाजपचाच असेल, असाही दावाही त्यांनी केला.महाडिक यांना सुरुवातीलाच सतेज पाटील यांच्या ‘मी एकटा पडलोय’ या विधानाबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत आपण काही बोलणार नसल्याचे सांगितले. मात्र पत्रकार परिषद संपताना पुन्हा ‘तुम्हाला कधी एकटा पडल्यासारखे वाटलेय का’ असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, एकापाठोपाठ एक पराभव झाले. त्या-त्या वेळी लोकांची भूमिका असते. पण आम्ही खचलो नाही. लोकांच्या कामात राहिलो. त्यामुळे मी पुन्हा खासदार झालो, अमल आमदार झाले.दिवस मावळला तरी दुसऱ्या दिवशी सूर्य उगवतो यावर माझा विश्वास आहे. ‘गोकुळ’मध्ये ‘त्यांचे’ काही संचालक आहेत. त्यामुळे त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आता आमचीही माणसे भेटायला जातील. राजू शेट्टी यांनी कारागृहातील गैरकारभाराचे पुरावे जर मुख्यमंत्र्यांना दिले असतील तर नक्कीच कारवाई होईल, असेही महाडिक यांनी सांगितले.आताच आमच्याकडे गर्दी..कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेत अनेकांचा प्रवेश होणार असल्याबाबत विचारणा केली असता महाडिक म्हणाले, भाजपमध्येही लवकरच प्रवेश होणार आहेत. परंतु मुळात आमच्याकडे माणसेच जास्त आहे. एखाद्या प्रभागात भाजपचा इच्छुक कार्यकर्ता असेल तर आम्हांला इतरांना प्रवेश देताना याचा विचार करावा लागेल.