आता महिनाभर दाढी घरातच करायची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:54+5:302021-04-06T04:23:54+5:30
कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट पुन्हा थैमान घालू लागल्यामुळे सरकारने आज, मंगळवारपासून ३० एप्रिलला निर्बंध उठेपर्यंत सलून व्यावसायिकांना व्यवसाय ...

आता महिनाभर दाढी घरातच करायची
कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट पुन्हा थैमान घालू लागल्यामुळे सरकारने आज, मंगळवारपासून ३० एप्रिलला निर्बंध उठेपर्यंत सलून व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ हजार सलून व्यावसायिक पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. दुकानेच बंद राहिल्यामुळे सर्वसामान्यांना आता केस-दाढी घरातच करावी लागणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत केशकर्तनालयांमुळे प्रार्दुभाव वाढतो, असा निष्कर्ष काढून सरकारने ती बंद ठेवण्यास सलून व्यावसायिकांना भाग पाडले. त्यामुळे २५ मार्च ते ऑक्टोबर २०२० पर्यंत दुकाने बंद होती. दुकाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अनेकांना पोलिसांचा मार सहन करावा लागला. ऑक्टोबर २०२० नंतर प्रशासनाने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर झालेले नुकसान भरून येण्यास मार्च उजाडला. या कालावधीत काहीसा दिलासा मिळाला होता. तोपर्यंत आता नव्याने दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.
चौकट
जिल्ह्यात साडेनऊ हजार सलून व्यावसायिक आहेत. प्रत्येक दुकानांमध्ये जितके काम कामगार करतील, त्याच्या काही टक्के मेहनताना देण्याची पद्धत आहे. त्यामुळे दिवसांवर कामगारांचा पगार होतो. त्यातून ते आपला घरखर्च चालवितात. हाच रोजचा पगार बंद झाला, तर घरखर्च कसा चालावयचा. मागीलवर्षी पहिल्या कोरोना लाटेत हातउसने, सावकरी कर्जे कशी फेडायची, असा प्रश्न सलून व्यावसायिक व कामगारांना पडला आहे.
कोट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत केशकर्तनालयांमुळे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याचे प्रशासनाने दाखवावे, अन्यथा आमचा व्यवसाय बंद करू नये, अशी प्रशासनाला विनंती आहे.
- सयाजी झुंजार,
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, कोल्हापूर