त्याबद्दल मी आभारी, पण..; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 19, 2025 14:41 IST2025-05-19T14:40:58+5:302025-05-19T14:41:57+5:30
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला कोणते खाते हवे याची विचारणा केल्यावर मीच त्यांना ...

त्याबद्दल मी आभारी, पण..; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला कोणते खाते हवे याची विचारणा केल्यावर मीच त्यांना ग्रामविकास खाते मागितले होते असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्रीपदासाठी माझा विचार झाला होता हे पुस्तकातून मांडले हा त्यांचा मोठेपणा आहे. त्याबद्दल मी आभारी आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
उध्दवसेनेचे खासदार राऊत यांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात मंत्री मुश्रीफ यांचा विचार गृहमंत्रीपदासाठी झाला होता, मात्र हे पद मुश्रीफ यांना अडचणीचे ठरेल असे शरद पवार यांना वाटले असा उल्लेख केला आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, हा संजय राऊत यांचा मोठेपणा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला खात्याबद्दल विचारणा केल्यावर मी त्यांना ग्रामविकास खाते सांगितले. गृहमंत्री पदासाठी माझा विचार करताना कदाचित त्यांना भीती वाटली असेल.
वाचा- ...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
राऊत यांच्या पुस्तकातील सर्वच मजकुराशी सहमत नाही. विशेषत: त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल जे लिहिले आहे ते मला मान्य नाही असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.