शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

Kolhapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून, पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:17 IST

घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली

अतुल आंबीइचलकरंजी : येथील स्वामी मळा परिसरात पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. मनीषा दिलीप धावोत्रे असे तीचे नाव आहे. खून करून पती दिलीप धावोत्रे हा स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात हलवला. चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्वामी मळा परिसरामध्ये दिलीप धोवोत्रे हा परिवारासह राहण्यास आहे. तो यंत्रमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करतो. त्यांना दोन मुले आहेत. मुले आपल्या आजोळी राहतात. गेल्या काही दिवसापासून दिलीप हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता. काही वेळा नातेवाईक येऊन हा वाद मिटवत होते. काल गुरुवारीही मनीषा व दिलीप यांच्यामध्ये मध्ये मोठा वाद झाला होता. याचाच राग मनात धरून दिलीप याने पत्नी मनीषा ही घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मानेवर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केले. यात मनीषा हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दिलीप हा पहाटे पाच वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला व मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी केली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस