पत्नीच्या बाराव्यादिवशी पतीचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:31+5:302021-06-09T04:30:31+5:30

पेरणोली : मुंगूसवाडी (ता. आजरा) येथे पत्नीच्या निधनाच्या धक्क्याने बाराव्या दिवशी पतीच्याही निधनाची घटना घडली. सयाबाई कृष्णा नरके (वय ...

Husband dies on wife's twelfth day | पत्नीच्या बाराव्यादिवशी पतीचे निधन

पत्नीच्या बाराव्यादिवशी पतीचे निधन

पेरणोली : मुंगूसवाडी (ता. आजरा) येथे पत्नीच्या निधनाच्या धक्क्याने बाराव्या दिवशी पतीच्याही निधनाची घटना घडली. सयाबाई कृष्णा नरके (वय ८९) व पती कृष्णा सखोबा नरके (१०२) अशी त्यांची नावे आहेत.

सयाबाई या अनेक वर्षे आजारी होत्या. त्या अंथरुणावर पडून होत्या. मात्र, पती कृष्णा यांची तब्येत चांगली होती. रोज काठी घेऊन फेरफटका मारत असत. सयाबाई यांचे २२ मे रोजी निधन झाले. पत्नीचा विरह सहन न झाल्याने कृष्णा यांनी अन्न, पाणी सोडले. ज्या दिवशी पत्नीच्या बाराव्याचा विधी झाला. त्याच दिवशी संध्याकाळी पती कृष्णा यांनीही जगाचा निरोप घेतला.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आजरा कारखान्याचे कर्मचारी अशोक नरके व जि. प. चे सेवानिवृत्त पाणीपुरवठा अधिकारी गणपतराव नरके यांचे ते आई, वडील आहेत.

दुसरी घटना

तीन महिन्यांपूर्वी आजरा येथील विजया सावंत यांच्या निधनाच्या धक्क्याने पती तानाजीराव सावंत यांचे निधन झाले होते. त्यानंतर तालुक्यातील ही दुसरी घटना सयाबाई नरके : ०८०६२०२१-गड-०५ * कृष्णा नरके : ०८०६२०२१-गड-०६

Web Title: Husband dies on wife's twelfth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.