डांबरीकरणाच्या बॉयलर गाड्यावर नवरा-नवरी बसले; शहरातील खराब रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 12:16 IST2025-05-18T12:16:06+5:302025-05-18T12:16:34+5:30
शहरातून अनोखी मिरवणूक: प्रिन्स क्लबचा उपक्रम

डांबरीकरणाच्या बॉयलर गाड्यावर नवरा-नवरी बसले; शहरातील खराब रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले
कोल्हापूर: मंगळवार पेठ खासबाग परिसरातील पुणे येथील आयटी कंपनीमध्ये नोकरीला असलेल प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते संकेत जोशी आणि सोनाली नायक हे विवाहबद्ध झाल्यानंतर शनिवारी त्यांची शहरातून अनोख्या पद्धतीने वरात निघाली. शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खासबागच्या प्रिन्स क्लबने त्यांची रोलर पुढे लावून डांबरीकरणाच्या बॉयलर गाड्यावर बसवून वरात काढली
शनिवारी विवाहबद्ध झालेले संकेत आणि सोनाली यांनी वरात वेगळ्या पद्धतीने काढण्याचा निर्णय घेतला. या नवदांपत्याची डांबरीकरणाचा बॉयलरच्या गाड्या बसून पारंपारिक लेझीम, हलगी, घूमके आणि सनईच्या तालावर वरात काढण्यात आली. महाद्वाररोड बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिपटी मार्गे खासबाग पर्यंत निघाली. वरातीचे नियोजन सचिन साबळे, अभिजीत पोवार, नामदेव माळी, सचिन पोवार, विशाल कोळेकर, विराज जगताप, बंडू हवाळ, रमेश मोरे, अशोक पवार यांनी केले.