शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीने घरातच चालवला वेश्याअड्डा, कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 12:58 IST

पत्नीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच सुरू केला होता वेश्याअड्डा

कोल्हापूर : पत्नीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्याअड्डा सुरू केला होता. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १) दुपारी बालिंगा (ता. करवीर) येथे छापा टाकून वेश्याअड्ड्यावर कारवाई केली. पीडित महिलेची सुटका करून पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिंगा परिसरात एका घरातच वेश्याअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी दुपारी छापा टाकला असता पतीकडूनच पत्नीच्या असहायतेचा गैरफायदा उठवत वेश्याअड्डा चालवल्याचे स्पष्ट झाले. पीडित महिला आणि तिचा पती दोघेही मूळचे कर्नाटकचे आहेत. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी ओएलएक्सवरून बालिंगा परिसरात घर भाड्याने घेतले होते. अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागातील रवींद्र गायकवाड, राजेंद्र घारगे, मीनाक्षी पाटील, किशोर सूर्यवंशी, अभिजीत पाटील, अश्विनी पाटील, तृप्ती सोरटे, किरण पाटील आदींनी ही कारवाई केली.घर भाड्याने देताना घ्या काळजीघर भाड्याने घेऊन गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे घर भाड्याने देताना घरमालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. भाडेकरूचे ओळखपत्र, मोबाइल नंबर घ्यावेत, त्यांच्या नातेवाइकांची माहिती घ्यावी, भाडेकरार करावा, शेजाऱयांना भाडेकरूंची कल्पना द्यावी, तसेच स्थानिक पोलिसांनाही माहिती देणे आवश्यक असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस